banner ads

कोपरगांवात श्रीराम नवमी निमित्त श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक पठण संपन्न

kopargaonsamachar
0

 कोपरगांवात श्रीराम नवमी निमित्त  श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक पठण संपन्न



श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक वाचन समितीचा उपक्रम
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
प्रभू श्रीराम यांचे वनवास काळात पदस्पर्शाने पावन झालेला श्री क्षेत्र गोदातीर परिसर, कोपरगांव तालुका 'संस्कृत' विषयाची अभिवृद्धी बालसंस्कार अभियान अंतर्गत श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक वाचन समिती, गोदातीर, कोपरगांव वतीने  श्रीराम नवमी (शके १९४७) निमित्ताने श्रीराम रक्षा स्तोत्राचे सामुदायिक वाचन करण्यात आले. 



                     
जाहिरात 

या प्रसंगी श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक वाचन समितीच्या कार्याध्यक्षा लताताई भामरे, श्रीराम मंदिर दत्तपारचे अध्यक्ष रविंद्र को-हाळकर, स्वयंसेवक सागर बडदे, स्वच्छतादूत सुशांत घोडके, संस्कृतभारती प्रतिनिधी अनिता माळी, विद्या प्रबोधिनीच्या सिमा हिरे, माधुरी कुलकर्णी, सी. एम. मेहता कन्या शाळेच्या शोभा दिघे, माधुरी हरिदास, सूर्यतेजच्या गायत्री भिडे, वर्षा जाधव, संदिप ठोके, सांस्कृतिक वार्तापत्राचे प्रतिनिधी रविंद्र निकम यांचे सह राष्ट्रसेविका, शालेय विद्यार्थी- विद्यार्थीनी व पालक उपस्थित होते. 

               
जाहिरात 

प्रारंभी प्रभू श्रीराम, सिता, लक्ष्मण, हनुमान यांच्या संयुक्त प्रतिमेचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'अनुलोम' माध्यमातून अयोध्या येथून आलेल्या श्रीराम पंचधातू मुर्तीचे पुजन करण्यात आले. यानंतर श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक वाचन समितीच्या कार्याध्यक्षा लताताई भामरे यांनी श्रीराम नवमीचे पौराणिक आणि अध्यात्मिक महत्त्व विषद करुन रामरक्षेची आरोग्य विषयक माहिती सांगुन सामुदायिक श्रीराम रक्षा वाचनाचा प्रारंभ केला. 

या प्रसंगी राष्ट्र सेविका भाग्यश्री बडदे, सुनयना केळकर यांना 'नारीशक्ती' पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

 श्रीराम रक्षा सामुदायिक वाचनात सहभागी सर्वांना श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा, अयोध्या येथील सोहळ्याचे कोपरगांव तालुक्यातील प्रथम मानकरी महंत रमेशगिरी महाराज, प्रभू श्रीराम यांचे वनवास काळात पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र कुंभारी येथील श्री राघवेश्वर देवस्थानचे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांचे शुभ आशिर्वाद 'संस्कार पत्र' आणि झाडाचे रोप देण्यात आले. 

संस्कार कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक वाचन समिती, कोपरगांव तालुका, धर्मयोध्दा माजी खासदार भिमराव (नाना) बडदे प्रतिष्ठान,महाराष्ट्र प्रांत, राष्ट्रसेविका, माजी सैनिक कै. रामलिंग (आप्पा) घोडके स्मृती प्रतिष्ठान, कोपरगांव, संस्कृत भारती, शिशु विकास मंदिर, विद्याप्रबोधिनी शाळा, श्रीराम भक्त राष्ट्रसेविका ऋचा धारणगांवकर, उषाताई शिंदे, निला दोशी, वृषाली कुलकर्णी, शैलजा भालेराव,प्रियंका थोरात, सुशिला ठाणगे, स्मिता कुलकर्णी,मनिषा बाविस्कर, विद्यादेवी लोखंडे, श्रीकांत गवळी, मंजुषा खरे, सुवर्णा भालेराव, सुनिल डोळस, शुभदा देशमानकर, मंगेश भिडे यांनी परिश्रम घेतले. शैला लावर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!