banner ads

कृषी संशोधक दिगंबर माधव उर्फ डी. एम. माळी यांचे निधन

kopargaonsamachar
0

 कृषी संशोधक दिगंबर माधव उर्फ डी. एम. माळी यांचे निधन 


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )


             तालुक्यातील खिर्डी गणेश भास्कर वस्ती येथील प्रगतशील शेतकरी, शेती संशोधक, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उस विकास अधिकारी दिगंबर माधवराव उर्फ डी. एम. माळी (९२) यांचे निधन झाले त्यांच्या मागे एक मुलगा वैभव, दोन मुली, जावई, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

                      जाहिरात 

 माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे ते विश्वासु निकटवर्तीय होते. कै. डी. एम. माळी यांनी संजीवनी कार्यक्षेत्रातील शेतक-यांचे उस उत्पादन वाढविण्यांत अनेक प्रयोग केले. त्यांच्या पार्थीवावर कोपरगांव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले. त्यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कृषी संशोधक दत्तात्रय कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, राज्य साखर संघाचे संचालक विवेक कोल्हे यांनी शोक व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे केमिकल विभागाचे कर्मचारी बाळासाहेब भास्कर यांचे ते चुलते होत.

            कै. दिगंबर माधवराव उर्फ डी. एम. माळी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातुन बी. एस्सी अॅग्री पर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी शासनाच्या कासोदा येथे कृषी संशोधन केंद्रावर सहा वर्षे नोकरी केली. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्यातील क्षमता ओळखुन त्यांना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात उस विकास अधिकारी म्हणुन आणले. कै. डी. एम. माळी यांनी ज्ञानाच्या जोरावर व माजीमंत्री कै. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील उस उत्पादक सभासद शेतक-यांचे प्रति एकरी उस उत्पादनाबरोबरच अन्य कृषी उत्पादन वाढविण्यांत मोलाची भूमिका बजावली. निरनिराळे प्रयोग करून शेतक-यांची आर्थीक क्रयशक्ती वाढविली. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी संजीवनीच्या प्रयोगात्मक शेती संवर्धनासाठी काम केले. कै. डी. एम. माळी यांच्या निधनाबददल कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, सर्व आजी माजी संचालक, विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक,मॅनेजींग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार, माजी कार्यकारी संचालक अंबादास अंत्रे, एम. ए. पाटील, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष वाल्मीक भास्कर, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, अॅडमिनीस्ट्रेटीव्ह ऑफिसर प्रकाश डुंबरे, ग्रुप हेड संजीव पवार, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सर्व ओव्हरसियर, सभासद शेतकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!