banner ads

मारहाण प्रकरणी जितेंद्र रणशुर यांना अंतरीम जामीन मंजुर

kopargaonsamachar
0

 डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती मिरवणुकी दरम्यान मारहाण प्रकरणी जितेंद्र रणशुर यांना अंतरीम जामीन मंजुर


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
दि.१४ एप्रिल २०२५ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती मिरवणुक कार्यक्रमानंतर कोपरगाव शहरातील सुभाषनगर भागात नन्नवरे कुटूंबीयांचा खुन करण्याच्या आरोपा प्रकरणी जितेंद्र रणशुर यांना अंतरीम जामीन मंजुर
                 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती मिरवणुकीनंतर सुभाषनगर भागात फिर्यादी हे त्यांचे घरासमोर उभे असतांना जितेंद्र रणशुर यांचे सांगण्यावरुन व त्यांचे पद काढून घेतल्यावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने विजय पाटोळे, किशोर डोखे, शांताबाई नन्नवरे व इतर लोकांना मारहाण करुन खुन करण्याच्या आरोपावरुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांनी विजय पाटोळे यांचे फिर्यादीवरुन भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), जुना ३०७, ११८ (जुना ३२६) व अन्य कलमांअन्वये गुन्हा दाखल केला होता. जितेंद्र रणशुर यांच्यावतीने ॲड. जयंत जोशी यांनी कोपरगाव येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन केला व राजकिय उद्देशाने जितेंद्र रणशुर यांचे नाव गोवण्यात आले आहे व त्यांचे विरुद्ध प्रथमदर्शनी केस नाही असे गृहित धरुन मे. न्यायालयाने अंतरीम अटकपूर्व जामीन मंजुर केला.
           उपरोक्त व उपलब्ध कागदपत्रे व युक्तीवादानंतर जितेंद्र रणशुर यांचा अटकपूर्व जामीन मंजुर झाल्यामुळे सामाजीक कार्यकर्ते जितेंद्र रणशुर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जितेंद्र रणशुर हे माजी नगरसेवक व आंबडेकर चळवळीमध्ये कार्यरत असल्यामुळे संपुर्ण परीसराचे मे. न्यायालयाचे आदेशाकडे लक्ष लागले होते.
ॲड. जयंत आत्माराम जोशी यांनी प्रकरणाचे कामकाज पाहिले व त्यांना ॲड. सुजय डि. होन, ॲड. सुरेंद्र व्हि, जाधव, ॲड. तन्मय डि. घोडके यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!