ज्योती सहकारी पतसंस्थेचा ५९५ कोटींचा एकत्रीत व्यवसाय --अॕड.रविकाका बोरावके
कोपरगाव च्या अर्थ कारणात ज्योती पतसंस्थेची महत्वाची भूमिका
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेकांना उद्योग व्यवसायात सक्षमपणे उभे करण्यासाठी आर्थिक पाठबळ देणाऱ्या ज्योती पतसंस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने धावत आहेत. संस्थेच्या माध्यमातून अनेक सर्वसाधारण नागरिक छोटे मोठे व्यवसायिक यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचे कार्य संस्थेचे सर्वेसर्वा अॕड. रविकाका बोरावके यांच्या दूरदृष्टी कोणाकडून व मार्गदर्शनाखाली संस्थेचे नियंत्रण दीपक प्रगती मोठ्या जोमाने सुरू आहे.
नुकत्याच झालेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात ज्योती सहकारी पतसंस्थेला ३ कोटी ३५ लाख नफा झाला आहे. यामध्ये ३६०कोटी रूपयांच्या ठेवी तर २३५कोटी रूपयांची कर्ज वितरीत केली आहे. संस्थेची गुंतवणूक १४८कोटी रूपयांची इतकी झाली आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ५९५कोटी इतका झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन अॕड. रविकाका बोरावके यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात ज्योती सहकारी पतसंस्थेला ३ कोटी ३५ लाख नफा झाला आहे. यामध्ये ३६०कोटी रूपयांच्या ठेवी तर २३५कोटी रूपयांची कर्ज वितरीत केली आहे. संस्थेची गुंतवणूक १४८कोटी रूपयांची इतकी झाली आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ५९५कोटी इतका झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन अॕड. रविकाका बोरावके यांनी दिली.
सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने संस्थेच्या भागभांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे. लेखापरिक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके संस्थेने पुर्ण करून सन २०२३-२४ या मागील आर्थिक वर्षासाठी शासकीय लेखा परिक्षणात 'अ' वर्ग मिळवला आहे. संस्थेने आवश्यक ती प्रमाणके पुर्ण करून ठेवी, कर्जे, भागभंडवल व गुंतवणूक या सर्वामध्ये वाढ झालेली दिसुन येत आहे. संस्थेच्या ३७ वर्षाच्या वाटचालीमध्ये सातत्याने विश्वास वाढतच चाललेला आढळून येतो. महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणुन हि ओळख निर्माण झाली आहे.
कर्ज वसुलीसाठी काही कर्जदाराबरोबर कठोर निर्णय घ्यावे लागले. मात्र त्यामुळे कर्ज वसुली चांगली झाली यापुढे यात सातत्य राखले जावुन नेहमीच ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल तसेच संस्थेने सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे व पुढेही घेत राहील. अशी माहिती संस्थेचे चेअरमन अॕड. रविकाका बोरावके यांनी दिली.
सामान्य नागरीक व इतर संस्थासाठी ठेवीच्या आकर्षक ठेव योजना सुरु केलेल्या आहेत. त्यास खातेदारांनी उत्तमरीत्या प्रतिसाद दिला. नव्या वर्षात छोटया मोठ्या उदयोजकांना व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरू करणार असल्याचे संस्थेचे व्हा.चेअरमन कारभारी जुंधारे यांनी माहिती दिली.
ज्योती पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ठेवी मध्ये ४३कोटी ची इतकी वाढ झाली असुन तिचे प्रमाण १४% आहे. तसेच कर्ज वाटपामध्ये २७ कोटी ची इतकी वाढ झाली असुन तिचे प्रमाण १३ टक्के व गुंतवणुकीमध्ये २०कोटी ची इतकी वाढ झाली आहे. अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापक सुरेश शिंदे यांनी दिली.
तसेच मागील वर्षीच्या नफ्याच्या तुलनेत यावर्षी ७०लाख ची एवढी वाढ झाली असुन त्याचे प्रमाण २६ टक्के इतके आहे. संस्थेची कर्ज वसुली समाधानकारक असुन नेट एन पी ए 0 टक्के इतका आहे. अशी माहिती संस्थेचे असि.मॅनेजर .सुनिल क्षिरसागर यांनी दिली.
संस्थेच्या प्रगतीत सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार व ज्योती मंगल ठेव प्रतिनिधी संस्थेचे सर्व संचालक, शाखधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. असे संस्थेचे चेअरमन अॕड. रविकाका बोरावके यांनी सांगितले.







