उर्वरित आरोपींना अटक करुन अतिक्रमित जागेत असलेल्या आरोपींवर बुलडोझर कारवाई करा
भ्याड हल्ल्याचा निषेध
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहरातील आयटीआय कॉलेज रोडलगत सोमवारी २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावरून वाद होऊन हाणामारी झाली. या घटनेत फिर्यादी योगेश दत्तात्रय मोरे यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना एका व्यक्तीने वाहन घेऊन जाऊ नका असे सांगितल्याने वाद निर्माण झाला. प्रारंभी झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. वाद सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनाही दुखापत झाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी आजीम करीम शेख, आमजत जाहाबाद पठाण, माजिद रशीद पठाण (सर्व राहणार गांधीनगर, कोपरगाव) यांच्यासह अन्य ४ ते ५ अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाज, तसेच सर्वपक्षीय च्या वतीने बंद पुकारण्यात आला होता,, सकाळी अकराच्या सुमारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर सदर घटनेचा निषेध व्यक्त करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहे,,, यावेळी उपस्थितांनी पोलीस स्टेशन ला निवेदन देत निषेध व्यक्त करत लवकरात लवकर उर्वरित आरोपींना अटक करा व अतिक्रमित जागेत असलेल्या आरोपींवर बुलडोदर कारवाई करा अशी मागणी केली आहे निवेदन दिल्यानंतर गाव पुन्हा सुरळीत सुरू करण्याचे आवाहन मोर्चेकरांनी केले









