banner ads

याहीवर्षी उजनी उपसा जलसिंचन योजना झाली सुरु

kopargaonsamachar
0

 याहीवर्षी उजनी उपसा जलसिंचन योजना झाली सुरु


आ. आशुतोष काळेंचा पुढाकार
 
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

   जवळके-धोंडेवाडी परिसराच्या गावातील शेती व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना याहीवर्षी आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून पुन्हा सुरु झाली असल्याची माहीती रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी दिली .
                                   जाहिरात 

 जिरायती गावातील व परिसरातील शेती व शेतकऱ्यांची पाण्याची अडचण दूर व्हावी व त्यांना उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी मा.आ.अशोकराव काळे यांनी २००४ ते २०१४ या दहा वर्षात त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पदरमोड करून रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना चालविली. तेव्हापासून या भागासाठी हि योजना वरदान ठरली आहे. मध्यंतरीचे काही वर्षामध्ये हि योजना पुन्हा बंद पडली असता आ.आशुतोष काळे यांनी २०१९ पासून हि योजना पुन्हा सुरु केली.

                        
जाहिरात 
त्यासाठी दरवर्षी हि योजना सुरु करण्यासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणी ते सोडवीत आले आहे.याहीवर्षी हि योजना पुन्हा सुरु करण्यासाठी आ. काळे यांनी स्विच यार्डातील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या सूचना देवून आवश्यक त्या ठिकाणी करावयाच्या दुरुस्त्या तातडीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार हि सर्व कामे पूर्ण झाली  असून रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांच्या हस्ते वीज पंपाचा स्वीच दाबून हि योजना पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे जवळके-धोंडेवाडी परिसरातील व नैऋत्य भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. यावेळी उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांच्या समवेत आप्पासाहेब थोरात, नवनाथ पोकळे, अनिल वाणी, अरूण थोरात, परसराम दरेकर आदी शेतकरी बांधव उपस्थित होते
.
                        जाहिरात 


योजना सिंचन व्यवस्थापनाकडे हस्तांतरणासाठी आ.आशुतोष काळे प्रयत्नशील ---
- २००४ ला मा.आ.अशोकराव काळे यांनी सुरु केलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना मध्यंतरी काही वर्ष बंद राहिल्यामुळे हि योजना शासनाच्या संगणकीकरण (ऑनलाईन) प्रणालीतून वगळण्यात आली होती. आ.आशुतोष काळे यांचे प्रयत्नातून उजनी उपसा जलसिंचन योजनेचे पुन्हा संगणकीकरण (ऑनलाईन) प्रणालीत समावेश करण्यात आला आहे.  आ.आशुतोष काळे यांच्या सर्वोतोपरी सहकार्यातून हि योजना सुरु राहणार याचा विश्वास जवळके-धोंडेवाडी परिसरातील व नैऋत्य भागातील शेतकरी व नागरिकांना आहे. परंतु या  योजनेचे पुन्हा संगणकीकरण (ऑनलाईन) प्रणालीत समाविष्ट केल्यामुळे ह्या योजनेला लागलेली घरघर बंद होण्यास मदत होणार असून देखभाल दुरुस्तीसाठी व दरवर्षी कराव्या लागणाऱ्या विविध दुरुस्तींच्या कामांसाठी आवश्यक असणारा निधी कायमस्वरूपी मिळावा यासाठी सिंचन व्यवस्थापनाकडे हि योजना हस्तांतरण करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांचे प्रयत्न सुरू आहे.-

अध्यक्ष बाबुराव थोरात.



 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!