अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू,
कोपरगाव - येवला मार्गावरील भास्कर वस्ती जवळील घटना
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२०) रात्री ९ वाजताच्या सुमारास-कोपरगाव - येवला मार्गावरील भास्कर वस्ती खिर्डी गणेश शिवार येथे घडली.
सध्या ऊसाचे क्षेञ कमी झाल्याने बिबट्यांचा वावर माणवी वस्त्यांकडे वाढला कुञी,शेळ्या,पाळीव जनावरे बिबट्यांचे भक्ष झाले अनेक कुञी गायब झाली नदी नाल्यांना पिण्यासाठी पाणी मिळत असल्याने परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार चालु झाला . गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एक बिबट्या भास्कर वस्ती जवळ रस्ता ओलांडताना त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान परीसरात गावकऱ्यांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे ,वनरक्षक श्रध्दा पडवळ ,अमोल किनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन मजुर प्रदिप इंदरखे,सागर इंदरखे हे घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पंचनामा करून गावक-यांच्या मदतीने त्या मृत बिबट्याला ताब्यात घेतले पुढील तपास वन विभागाचे कर्मचारी करीत आहेत






