banner ads

अंध व्यक्तींच्या आयुष्यात येणार नवीन प्रकाशाची पहाट !

kopargaonsamachar
0

 अंध व्यक्तींच्या आयुष्यात येणार नवीन प्रकाशाची पहाट !

साईंच्या नगरीत संपन्न झाले नेत्रदान

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

  साईबाबा संस्थान ट्रस्टचे श्री साईनाथ रुग्णालय येथे नुकतीच आय बँक सुरू करण्यात आलेले असून या आय बँकेमध्ये दिनांक 20 मार्च  रोजी द्वारकामाई वृद्धाश्रम येथील श्री शशीधर सिताराम बेकल   वय वर्ष ६३ राहणार द्वारकामाई वृद्धाश्रम शिर्डी यांचे मरणोत्तर नेत्रदान संपन्न झाले ,  या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यात नवीन प्रकाशाची पहाट होणार आहे .

याकामी साईनाथ नेत्रपेढीचे ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर तसेच आय बँक मॅनेजर डॉ.अशोक गावित्रे साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका मैथिली पितांबरे ,साईबाबा हॉस्पिटल चे वैद्यकीय संचालक डॉ शैलेश ओक,तसेच
उपसंचालक  प्रीतम वडगावे स , मुख्य कार्यकारी अधिकारी  गोरक्षनाथ गाडीलकर  यांचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी  ऋषि क्रोते ,श्रद्धा भुसावळ, सचिन घारे ,अकबर मामा तसेच  डॉ निघूते , डॉ विखे , डॉ पाटिल  आदींच मोलाचं सहकार्य लाभलं, 

या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यात नवीन प्रकाशाची पहाट होणार आहे या नेत्र पेढीमुळे अनेक अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश फुलणार असून साईबाबांच्या हयातीत सुरू असलेले रुग्णसेवेचे काम शिर्डी मध्ये चालू असून या नेत्रपेढी मुळे अनेक अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश  येणार असून हजारो अंध व्यक्तीना याचा फायदा होणार आहे  मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी 7972677781 या नंबर वर संपर्क करण्याचा आवाहन डॉ अशोक गावित्रे यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!