सोयाबीन खरेदीचे चार कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यात जमा -- सभापती.साहेबराव रोहोम
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
कृषि उत्पन्ऩ बाजार समिती कोपरगांवच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील ५५६ शेतकरी वर्गाने ८५९० क्विंटल सोयाबीन विक्री केलेला असुन त्यांचे पेमेंट ४८९२ ने रक्क़म रुपये ४,२०,२२,२८० शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती सभापती साहेबराव रोहोम व उपसभापती गोवर्धन परजणे यांनी दिली .
शासनाने सन २०२४-२५ करिता सोयाबीन शेतीमालाचा आधारभुत दर ४८९२ रुपये जाहिर केला असुन कोपरगांव तालुक्यातील शेतक-यांसाठी कृषि उत्पन्ऩ बाजार समिती कोपरगांवच्या मुख्य़ मार्केट यार्ड ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रावर शासनाचा आधारभुत दर ४८९२ रुपये या प्रति क्विंटल दराने ८५९० क्विंटल सोयाबीन खरेदी केली होती. सोयाबीनचे भाव पडलेले असल्याने यामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला होता.
कृषि उत्पन्ऩ बाजार समिती कोपरगांवच्या मुख्य़ मार्केट यार्ड या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या सर्व शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर सोयाबीन खरेदीची रक्क़म जमा झालेली आहे. ज्या शेतक-यांच्या खात्यात रक्क़म जमा झाली नाही त्यांनी बाजार समितीचे कार्यालयात संपर्क करावा, अशी माहिती बाजार समितीचे सचिव .नानासाहेब रणशुर यांनी दिली .