एक दिवसासाठी महिला सरपंच व महिला उपसरपंच करुन महिलांचा सन्मान .
जागतिक महिला दिनानिमित्त टाकळी ग्रामपंचायत चा अभिनव उपक्रम.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
टाकळी ग्रामपंचायतीने जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन केले. त्यामध्ये सरपंच संदीप श्रीपत देवकर यांच्या संकल्पनेतून आजच्या महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करनेहेतु एक दिवसीय महिला सरपंच म्हणून सौ. कल्पना लक्ष्मण मालकर व महिला उपसरपंच म्हणून सौ. भारती बाळासाहेब देवकर यांना संधी देण्यात आली ग्रामपंचायतचा हा अभिनव उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
एक दिवसीय महिला सरपंच यांचा सन्मान संदीप देवकर व एक दिवसीय महिला उपसरपंच यांचा सन्मान माजी सभापती सुनील देवकर यांनी केला. तसेच गावातील महिला विजया नंदू आमले यांचा आदर्श महिला म्हणून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास कोपरगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी. शबाना शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच संजय देवकर ग्रामपंचायत सदस्य शशिकांत देवकर, सौ. रूपाली मालकर, श्रीमती. हिराबाई मोरे, ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब गुंड , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ कांता देवकर , श्री. रणधीर, पोलीस पाटील. राजेंद्र देवकर तसेच आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर गावातील महिला उपस्थित होत्या.






