banner ads

भरधाव स्कॉर्पिओ दुकानात घुसली – अपघाताचा थरार

kopargaonsamachar
0

 भरधाव स्कॉर्पिओ दुकानात घुसली – अपघाताचा थरार

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

नागपूर-मुंबई महामार्गावर, एस. जे. एस. हॉस्पिटलजवळ, मंगळवारी दुपारी  १२ वाजता एक भीषण अपघात घडला असुन त्यात भरधाव वेगाने येणारे स्कॉर्पिओ वाहन (MH 12 NZ 0057) कोपरगावच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते थेट साई जनार्दन हॉटेलजवळील गोदावरी जनरल स्टोअर दुकानातमध्ये घुसले. या घटनेत तीन ते चार जण जखमी झाले असून, अपघाताआधी याच वाहनाने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजमध्ये स्कॉर्पिओ अत्यंत वेगाने येताना आणि अचानक अनियंत्रित होऊन दुकानात घुसतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे.दुकानात व दुकाना समोर उभ्या असलेल्या नागरिकांची एकच धांदल उडाली

अपघातानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला असुन नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने मदतकार्य सुरू केले. प्राथमिक तपासात वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे, कारण पोलिसांना गाडीमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे नशेत वाहन चालवल्यामुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या अपघातात गोदावरी जनरल स्टोअरचे मालक आकाश विलास गोंदकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गाडीच्या जोरदार धडकेमुळे स्टोअरमधील साहित्य उद्ध्वस्त झाले असून, दुकानाचा मोठा भाग मोडीत निघाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर जवळच्या एस. जे. एस. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर कोपरगाव शहर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत वाहनचालकाला ताब्यात घेतले असून, सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!