उजनी उपसा जलसिंचन योजना यावर्षीही सुरु राहणार– संदिप थेटे
आ.आशुतोष काळे पदरमोडीची परंपरा सुरु ठेवणार
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
जवळके-धोंडेवाडी परिसराच्या गावातील शेती व शेतकऱ्यांचा आधार असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या दहा वर्षात कार्यकाळात पदरमोड करून चालविली होती. तो वसा आणि वारसा जपतांना आ.आशुतोष काळे यांनी पदरमोडीची परंपरा पुढे सुरु ठेवत २०१९ पासून रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना सातत्याने सुरु ठेवली आहे. त्यांच्या पुढाकारातून याहीवर्षी उजनी चारी उपसा जलसिंचन योजना सुरु राहणार असून त्याबाबत आवश्यक त्या दुरुस्ती कामाच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदिप थेटे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील जवळके–धोंडेवाडी परिसरासाठी साठी उजनी उपसा जलसिंचन योजना वरदान ठरली आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात दुर्दैवाने या योजनेकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्यामुळे हि योजना बंद पडून या भागातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते. मात्र २०१९ ला निवडून येण्यापूर्वी या भागातील जनतेला रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करण्याचा दिलेला शब्द आ.आशुतोष काळे यांनी पाळत आजतागायत ही योजना सुरु ठेवली आहे.
हि योजना सुरु राहावी यासाठी दरवर्षी येणारे वीज पंपाचे वीज बिल व वीज पंपांच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चासाठी करावी लागणारी पदरमोड आ.आशुतोष काळे यांनी स्वत: केली आहे. दरवर्षी प्रमाणे हि योजना याहीवर्षी सुरु ठेवावी यासाठी जवळके-धोंडेवाडी परिसराच्या गावातील शेतकरी व नागरिकांनी आ. काळे यांच्याकडे मागणी केली होती.त्या मागणीची दखल घेवून हि योजना पुन्हा सुरु ठेवण्यासाठी आ. काळे यांनी स्विच यार्डातील ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती सूचना तसेच आवश्यक त्या ठिकाणी सर्व दुरुस्त्या करण्याच्या सूचना दिल्या असून काम सुरु करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उजनी उपसा जलसिंचन योजना सुरु राहणार असल्यामुळे जवळके-धोंडेवाडी परिसराच्या गावातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते संदिप थेटे यांनी सांगितले आहे.