banner ads

स्व. शंकरराव कोल्हे हे ज्ञान आणि विचारांचे विद्यापीठ होते - सुमित कोल्हे

kopargaonsamachar
0

    स्व. शंकरराव  कोल्हे हे ज्ञान आणि विचारांचे विद्यापीठ होते   - सुमित कोल्हे

येसगांवच्या न्यु इंग्लिश  स्कूलमध्ये स्व. कोल्हे यांच्या पुण्यस्मतिथी ते जयंती निमित्ताने व्याख्यान मालेचे आयोजन

कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
 स्व. शंकरराव  कोल्हे यांनी पुणे विद्यापीठातुन १९५० साली बी. एस.सी.  अॕग्री ही पदवी संपादन केली आणि उच्च शिक्षणासाठी परदेशात  गेले. तेथे नोकरीच्या मोहात न पडता मायदेशी  येवुन समाजासाठी कार्य करीत राहीले. त्यांच्या एकुण जीवन प्रवासावरून व त्यांनी केलेल्या कार्यातुन स्व शंकरराव  कोल्हे हे ज्ञान आणि विचारांचे  विद्यापीठ होते, असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त   सुमित कोल्हे यांनी काढले.

येसगाव येथिल न्यु इंग्लिश  स्कूलने स्व. शंकरराव  कोल्हे यांच्या तुतिय पुण्यस्मतिथी ते जयंती निमित्ताने आठवडाभर व्याख्यान  मालेचे आयोजन केले आहे . या मालेचे पुष्प गुंफताना श्री  कोल्हे विद्यार्थां समोर बोलत होते. या प्रसंगी येसगाव सोसायटीचे चेअरमन सचिन कोल्हे, स्कूल कमिटीचे सदस्य बाळासाहेब निकोले, किरण गायकवाड, अमोल झावरे, कपिल सुराळकर, उत्तम पाईक, अतुल सुराळकर, सतिष गोसावी, ग्रामस्थ, मुख्याद्यापक रंगनाथ  ठाकरे, आदी उपस्थित होते.
श्री कोल्हे पुढे म्हणाले की स्व. कोल्हे उच्च शिक्षित होते. परंतु आपण सर्व सामान्यातील वाटावे यासाठी त्यांनी कायमचा धोतर, शर्ट व टोपी असा पेहराव स्वीकारला. त्यांनी सहकार समजुन घेण्यासाठी एका कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणुन काम केले व नंतर संजीवनी कारखाना काढला. त्यांनी शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन त्यांच्यासाठी अनेक आंदालने केली व मोठ्या राजकिय त्यागाला सामोरे गेले.

 येसगावची शाळा  आणि स्व. कोल्हे यांच्यात अनोखे नाते होते. १०७१ साली येसगांवची शाळा  एका मंदीरात सुरू झाली होती आज तिची वाटचाल भव्य इमारतीत  झाली असुन सर्व सोयी येथे आहेत. स्व कोल्हे यांनी स्वतःच्या आचरणातुन संपर्कातील व्यक्तींना चांगले संस्कार दिले.ते वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते. जीवनात व्यायामाचे महत्व त्यांनी शेवट पर्यंत जपले. ते सतत वाचन करीत असे व नवीन पिढीला त्यातुन माहिती देत.प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आजारपणावर मात केली, असे श्री कोल्हे शेवटी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!