banner ads

शिवसेनेच्या रोजगार मेळाव्यात युवकांनी सहभागी होत नोकरीच्या संधी शोधाव्यात.. शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे

kopargaonsamachar
0

 शिवसेनेच्या रोजगार मेळाव्यात युवकांनी सहभागी होत नोकरीच्या संधी शोधाव्यात.. शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे 


५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या सहभागी होणार

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
  राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, युवा नेते अभिषेक चौधरी यांच्या वतीने रविवारी २३ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात महाराष्ट्रातील ५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या सहभागी होणार असून युवकांना नोकरी शोधण्याची नामी संधी या मेळावामुळे उपलब्ध झाली आहे. तेव्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे  यांनी केले आहे.
२३ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २वाजता हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात महिंद्रा, टाटा, इनफिलोम, Hitachi astemo, legrand, के बी एस, टपारिया, एमडी, रेमंड, बजाज, एमआरएफ,लुसी, बीपीटी बिर्ला अदी नामांकित कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या वतीने 
युवकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे व कागदपत्रांची पूर्तता करून या मेळाव्यात सिलेक्शन झालेल्या युवकांना लगेचच नोकरीवर रुजू करण्यात येणार आहे. तेव्हा आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी युवकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन नितिनराव औताडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!