गोदावरी डाव्या कालव्यात अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळले
शेतकऱ्यांमध्ये खळबळ उलटसुलट चर्चा
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
गोदावरी तट डाव्या कालव्यात बोलकी ता.कोपरगाव शिवारात ६५ वर्षे अज्ञात व्यक्तीचे प्रेत शुक्रवार ( दि. १४ ) दुपारी १ वा. आढळून आले. घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.
तालुक्यातील खिर्डी गणेश येथील काही शेतकऱ्यांना खिर्डी गणेश शिवारात गोदावरी कालव्यात एक प्रेत काटेरी झुडपाला अडकल्याचे दीसताच त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना दुरध्वनी व्दारे त्याची खबर दिली पोलिस कर्मचारी सदर ठीकाणी येईपर्यंत ते प्रेत पाण्या बरोबर पुढे वाहून गेले परत त्याचा शोध घेतला असता ते कालव्यात बोलकी शिवारात मिळून आले .दुपारी ३ वाजेच्या सुमारास गावकऱ्यांच्या मदतीने पात्रातील प्रेत बाहेर काढण्यात आले.,वय अंदाजे ६५ वर्षे , अंगात सफेद शर्ट आणि सफेद रंगाचा पायजमा असे मृतदेहाचे वर्णन आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान गोदावरी तट डाव्या कालव्याची खोली व कालव्याच्या पाञात झाडे झुडपे पहाता सदर इसमाचे प्रेत पाण्यात आढळल्याने शेतकऱ्यां मध्ये उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.


.jpg)



