जेऊर पाटोदा ग्रामपंचायत कडून दिव्यांगांना किराणा किटचे वाटप
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग लाभार्थ्यांना किराणा किटचे वाटप कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र केकाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
जेऊर पाटोदा ग्रामपंचायत दिव्यांगासाठी राबवित असलेले उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असुन इतर ग्रामपंचायतींनीही असा उपक्रम राबविण्याची गरज आहे. यातून गरजूंना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार असल्याचे मा.सभापती मच्छिंद्र केकाण यांनी सांगितले .तर सरपंच मनिषा सतिष केकाण म्हणाल्या की तालुक्याच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे ,युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने शासनाच्या ग्रामस्थांसाठी असलेल्या सार्वजनिक अथवा वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी सदैव प्रयत्नशील असुन या योजनां पासुन एकही लाभार्थी वंचित राहणार नसल्याचे सांगितले . किराणा किट मिळाल्यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे
यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र केकाण , सरपंच मनीषा सतिश केकाण माजी सरपंच सतिश केकान , उपसरपंच जालिंदर गरुड,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य रामदास केकान ,अरुण आव्हाड, लंका किसन भाबड ,भारती भाऊसाहेब भाबड, सपना संजय बोरावके ,कार्तिक नाईक, अशोक जगताप, सविता साहेबराव जाधव ,जयश्री अमोल गोंदकर , ग्रामपंचायत अधिकारी संदिप थोरात ,अरविंद अंभोरे ,सुनील घुले, मयुरी रमेश सानप ,सचिन कोताडे, ग्रामपंचायत कर्मचारी सह दिव्यांग बांधव , ग्रामस्थ उपस्थित होते





