banner ads

" ती’चा सन्मान, घरेलू मदतनीसांना मानाचं पान!"

kopargaonsamachar
0

 " " ती’चा सन्मान, घरेलू मदतनीसांना मानाचं पान!"


जिजाऊ मराठा महिला मंडळानं जपलं सामाजिक भान

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

चरितार्थासाठी घरेलू मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. स्वच्छतेपासून ते स्वयंपाकापर्यंत घरातील अनेक जबाबदाऱ्या मदतनीस सांभाळत असतात. घरातील अन्य सदस्यांप्रमाणेच मदतनीस मावशींसोबत जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. याचं जिव्हाळ्याचं रुपांतर आत्म-सन्मानात करण्याचा अनोखा उपक्रम जिजाऊ मराठा महिला मंडळाने हाती घेतला होता. मंडळाच्या वार्षिक हळदी-कुंकू समारंभाचे औचित्य साधून मदतनीस महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांना वाण स्वरुपात भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत रॅम्प वॉकही करण्यात आला.


मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाच्या समारंभाचे आयोजन केले जाते. हा समारंभ महिलांसाठी विशेष आकर्षणाचा असतो. दरवर्षी जिजाऊ मराठा महिला मंडळाच्या वतीने सार्वजनिक हळदी कुंकू समारंभाच्या आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी मंडळाच्या अध्यक्षा सौ. रामेश्वरी मिलिंद जोरे,  उपाध्यक्षा सौ. सुचेता शांताराम घुमरे यांच्या संकल्पनेतून घरेलू मदतनीस महिलांना खास आमंत्रित करण्यात आले होते. पन्नास हून अधिक मदतनीस महिला कार्यक्रमात सहभागी झाल्या.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ मदतनीसांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाच्या सदस्या व उपस्थित मदतनीस महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भेट स्वरुपात आकर्षक वाणही देण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत रॅम्प वॉकही करण्यात आला. 


मदतनीस मावशी घरातील सदस्याप्रमाणेच  असतात आजच्या धावपळीच्या जीवनात घरकामात
 मदतनीस महिलांना त्याचं मोलाचं सहाय्य मिळते. मदतनीस मावशींचा आत्मसन्मान उंचावा व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते अशी भावना मंडळाच्या अध्यक्षा सौ. रामेश्वरी जोरे व उपाध्यक्षा सौ. सुचेता घुमरे यांनी यावेळी बोलनाता व्यक्त केली.
आजवर पडद्यामागे राहून घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांना मानाचं स्थान मिळाल्याचा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावर झळकत होता. कार्यक्रमात मंडळाच्या संस्थापक तसेच कार्यकारणी सहित सर्व सदस्या महिला मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या. सौ. स्मिता पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


जिजाऊ मराठा महिला मंडळाच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. विविध सामाजिक उपक्रमांच्या आयोजनात मंडळ अग्रभागी असते. चालू वर्षी वृक्षारोपण, स्वातंत्र्यदिन, एकादशी दिंडी, श्रावणातील गाणी, खेळ, मेहंदी, उखाणे तसेच कोजागिरी पौर्णिमा, जिजाऊ जयंती, प्रजासत्ताक दिन असे कार्यक्रम साजरे करण्यात आले. आगामी वर्षभरात महिलांसाठी विविध उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!