मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने
संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्राप्त
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने अहिल्यानगर जिल्हा परिषदेला मिळालेल्या १८ रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्राप्त झाली असून तिचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला.
त्याप्रसंगी राजेश परजणे पाटील यांनी संवत्सर आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील गरीब जनतेची आरोग्य सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेने अत्यंत चांगला असा उपक्रम सुरू केलेला आहे.
दवाखान्यातील तातडीच्या पेशंटला पुढील उपचार करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या दवाखान्यात पेशंटला पाठवण्यासाठी सोय झालेली आहे. त्यामुळे परिसरातील जनतेसाठी ही अत्यंत समाधानाची बाब आहे. यामुळे सरकारी दवाखान्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदललेला आहे. ज्या दवाखान्यात सर्व यंत्रसामुग्री व इतर सुविधा असतात त्या ठिकाणी उपचार देखील चांगल्या प्रकारे केला जातो.





.jpg)



