संस्कृतीची शिकवण देण्यांत नद्याचा सिंहाचा वाटा-राघवेश्वर महाराज
कोपरगाव - ( लक्ष्मण वावरे )
जगांत दीड लाख तर भारतात चारशे आणि महाराष्ट्र राज्यात १०३ नद्या असुन त्या आपल्या पर्यावरणाचा मोठा भाग असुन संस्कृतीची शिकवण देण्यांत त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन श्री श्री श्री १००८ कुंभारी आश्रमाचे मठाधिपती प.पू. राघवेश्वर महाराज यांनी केले, सध्या प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे महाकुंभमेळा सुरु असल्याचे ते म्हणाले.
तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर येथे सटीचे कानडगांव (छत्रपती संभाजीनगर) येथुन पायी आलेल्या साईबाबा दिंडीचे पुजन ब्रांच पोष्टमास्तर दत्तात्रय गायकवाड यांच्या निवासस्थानी करण्यांत आले त्याप्रसंगी के बोलत होते.
प्रातिनिधीक स्वरुपात गंगा गोदावरी व नर्मदा नदी जयंती निमित्त कुमारी सम्राज्ञी रेणूका विवेक कोल्हे या कन्येचे पुजन करण्यात आले. सतिष गजरे सर संवादित साई खिचडी भजनाचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला दिंडीचालक रमेश व संतोष नलावडे यांनी पायी साई दींडीचा उददेश सांगितला. दिंडीचे हे तेरावे वर्ष होते.
श्रीश्री श्री १००८ प.पू. राघवेश्वर महाराज पुढे म्हणाले की, भगवान प्रभू रामचंद्राचे पदस्पर्शनि नाशिक त्रबकेश्वर दक्षिण गंगा गोदावरी नदीचा काठ पवित्र आहे, अनेक साधू संत यांनी येथे तपसाधना केलेली आहे. आज असंख्य भाविक नर्मदा, गोदावरी नदी परिक्रमेत सहभाग घेत आहेत. जगात प्रयागराज येथे सर्वात मोठा कुंभमेळा सुरु असून, १४४ वर्षानंतर आलेल्या अनन्य साधारण धार्मीक योगावर आजपर्यंत 60 कोटी पेक्षा अधिक भाविकांनी याचा लाभ घेतला आहे. नर्मदा, गोदावरी नदी जयंतीत प्रत्येकाने नदीचे महात्म जाणून घेऊन धार्मिकतेची शिकवण सर्वांनी आत्मसात करावी.
याप्रसंगी सौ रेणुका विवेक कोल्हे, ज्ञानेश्वर नलावडे, बाबासाहेब गायकवाड, जेऊरचे सरपंच गणेश पवार, वैभव कसरे, सुदाम साबळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते, जया एकादशीच्या पर्वावर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात. शेवटी सौ. दिपाली दत्तात्रय गायकवाड यांनी आभार मानले.




.jpg)




