किडनी उपलब्ध असल्याचा मेसेज फाॅरवर्ड करु नका
अवयवदान चळवळीच्याकार्यकर्त्यांचे आवाहन
सध्या सोशल मिडीयात एक मेसेज अनेकवेळा अनेक गृपमध्ये फिरत आहे.आपणास तो अनेक वेळा प्राप्त झालेला आहे. चार किडनी उपलब्ध असुन दान करायच्या आहेत, असा तो मेसेज असुन मानवतेचे कृत्य म्हणून तो अनेकजण खातरजमा न करता पुढच्या गृपमध्ये पाठवत असतात. सदरचा मेसेज खोटा व अवयवदानाबद्दल गैरसमज पसरविणारा असल्याचे अवयवदान चळवळीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे.
सदर मेसेज मध्ये म्हटले आहे की,चार किडनी उपलब्ध आहेत.आमचे कौटुंबिक भाऊ श्री सुधीर आणि त्यांच्या पत्नीचा काल अपघातात मृत्यू झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले आहे. त्याच्या कुटुंबीयांना त्याची किडनी मानवतेसाठी दान करायची आहे. हा मेसेज २०१७ पासुन सोशल मिडीयात फिरत आहे. खरे तर अवयवदान या पध्दतीने होत नाही.१९९४ च्या मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार अवयवाची व्यापारी देवाणघेवाण म्हणजेच खरेदी -विक्री वर बंदी आणण्यात आली आहे.तसेच अवयव मिळवण्यासाठी प्रलोभन दाखविणे,बळजबरी करणे या गोष्टी कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे.
अवयवदान पारंपरिक रुढी ,परंपरेचा मोठा अडथळा असतो. नेत्रदान केल्यास पुढील जन्मात अंधत्व येते यासारख्या अनेक अंधश्रद्धा अवयवदानात अडथळे येतात.अवयव काढल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देऊन पारंपरिक पध्दतीने अंत्यसंस्कार करता येतात.
मृत्युनंतर देहदान सुध्दा करता येते. आरोग्यविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होत आहे.
" अवयवदानाच्या प्रकियेवर सरकारच्या संस्थेंचे नियंत्रण असते. त्यामुळे खोडसाळपणे बनविलेला किडनी उपलब्ध असल्याचा मेसेज फाॅरवर्ड न करता शास्त्रोक्त माहिती असलेले मेसेज पुढे पाठवावे"
-कृष्णा चांदगुडे,
(अवयवदान चळवळीचे कार्यकर्ते)


.jpg)
.jpg)




