banner ads

रवंदे येथे विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर

kopargaonsamachar
0

 रवंदे येथे  विद्यार्थ्यांचे  आरोग्य तपासणी शिबिर 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे ) 

पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे येथे विद्यार्थ्यांच्या  आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात २५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
 या शिबिराचे उद्घाटन रवंदे गावचे उपसरपंच ऋषिकेश कदम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत सोनवणे ,डॉ. वैजयंती होन, डॉ. विक्रम खटकाळे ,डॉ. जगताप, डॉ. आयनॉर ,सी ई ओ निकम व मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त रमाई भीमराव आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
 यावेळी डॉ. वैजयंती होन, डॉ. विक्रम खटकाळे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून ज्या ज्या विद्यार्थ्यांना आजार आहेत अशा विद्यार्थ्यांना औषधोपचार केले गंभीर आजाराचे विद्यार्थी यांना रेफर करण्यात आले सर्दी खोकला आजाराची मुले जास्त होती
कॅल्शियमचे प्रमाण कमी असलेल्या विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात आल्या .प्रत्येक विद्यार्थ्याचे आरोग्य कार्ड भरण्यात आले विद्यार्थ्यांना निरोगी राहण्याचा कानमंत्र डॉक्टर वैजयंती होन यांनी दिला . शाळेत अल्पोपहार व चहापाण्याची डॉक्टरांची सोय करण्यात आली होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!