प्रियंका ताते हिने उंचावली चांदेकसारेची मान
महसूल सहाय्यक पदी निवड
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ ताते यांच्या पुतणी मातंग समाजातील परिसरातील पहिलीच मुलगी जीने चांदेकसारेची मान उंचावली आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून ध्येय आणि चिकाटीने प्रचंड मेहनत करत नाशिक येथे खाजगी शिकवणी लावत महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत.कु प्रियंका कैलास ताते हिची महसूल सहाय्यकपदी निवड झाली
ही ताते कुटुंबासाठी व चांदेकसारे गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे वडील कैलास ताते व गोपीनाथ ताते यांनी सांगितले. तिची महसूल सहायक पदी निवड झाल्यानंतर
निवडबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. तिचे प्राथमिक शिक्षण नाशिक येथील रविंद्रनाथ विद्यालय येथे पूर्ण झाले. त्यानंतर नाशिक येथील K.V.N. नाईक इंजिीअरिंग कॉलेज मध्ये कॉम्प्युटर इंजिनीरिंग पदवी घेतली.शिक्षण घेतल्यानंतर नाशिक येथे शिकवणी लावून अभ्यास केला. तिचा कुटुंबातील ती पहिलीच पदवीधारक मुलगी आहे आणि पहिलीच शासकीय सेवेत लागलेली मुलगी आहे.
ती मागील चार ते पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती.
ती मागील चार ते पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती.
विविध परीक्षा दिल्या मात्र थोड्या फार गुणांनी यश दूर राहत होते. मात्र यावेळी यश आले आणि आई वडील आजोबांचे यांचे स्वप्न पूर्ण केले. तिने सर्व विद्यार्थ्यांना एक संदेश दिला आहे की एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी देखील जिद्द आणि चिकाटीने शासकीय अधिकारी होऊ शकते आणि यश संपादन करू शकते.








