banner ads

कोल्हे साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार "ऑस्कर ऑफ द इंडस्ट्रीज " पुरस्काराने सन्मानीत

kopargaonsamachar
0

  बाजीराव जी. सुतार "ऑस्कर ऑफ द इंडस्ट्रीज " पुरस्काराने सन्मानीत 

पुरस्कार  माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांना समर्पित 

कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

            सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार यांना चिनी मंडी (साखर व व्यापार) या देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणा-या संस्थेने "एक्सलन्स इन मॅनेजमेंट फ्रॉम को. ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज" शुगर इथेनॉल व बायो एनर्जी इंटरनॅशनल अवॉर्डस २०२५ (ऑस्कर ऑफ द इंडस्ट्रीज) पुरस्कार नविदिल्ली येथे  प्रदान केला त्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष  बिपीनदादा कोल्हे  व कारखान्याचे  चेअरमन  विवेक  कोल्हे, व्हाईस चेअरमन  राजेंद्र कोळपे  व संचालक मंडळाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यांत आला. 

सदर पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील सहकारी साखर कारखानदारीतील दोन कार्यकारी संचालकांची निवड करण्यांत आली त्यात बाजीराव जी. सुतार यांचा समावेश होता.
           देशातील व परदेशातील नामांकित साखर उद्योग सहकारी व खाजगी संस्था व त्यांचे कारखानदार, साखर उद्योग तज्ञ, शास्त्रज्ञ, व्यापारी या घटकाशी जोडल्या जाणा-या संशोधन संस्था व संबंधीत घटक इत्यादींचा समावेश असणा-या घटकांची आंतरराष्ट्रीय परिषद नविदिल्ली येथे नुकतीच आयोजित करण्यांत आली होती त्याचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री  नितीन गडकरी  यांच्या हस्ते झाले. त्यात बॉलीवुड ऍक्ट्रेस हीना खान यांच्या हस्ते  बाजीराव जी. सुतार यांना पुरस्कार प्रदान करण्यांत आला.

            सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पार पडलेल्या सत्कार समारंभास उत्तर देतांना मॅनेजिंग डायरेक्टर  बाजीराव जी. सुतार म्हणांले की, सदरचा पुरस्कार हा मी माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांना समर्पित करतो.

           तसेच आजवर गेल्या ३९ वर्षापासुन सहकारात काम करतांना आपल्याला सहकार भूषण पुरस्कार २०१३, तसेच वारणा कारखान्यांत काम करतांना उत्कृष्ट उद्योजगता पुरस्कार, तसेच इंदापुर कारखान्यांत काम करीत असतांना देशातील सर्वोच्च साखर निर्यातीचा २०१९ पुरस्कार प्राप्त झाले, तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात काम करतांना माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या संकल्पनेमुळे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष  बिपीनदादा कोल्हे, कोपरगांव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलता कोल्हे  व विद्यमान चेअरमन  विवेक  कोल्हे  यांचे मार्गदर्शनांतुन उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार २०२१,बेस्ट इनोव्हेटीव्ह शुगर फॅक्टरी इन इंडिया २०२२, नॅशनल शुगर इन्स्टीटयुट कानपुर यांच्यावतीने उत्कृष्ट नाविन्यपुर्ण कारखाना २०२३, व सर्वोत्कृष्ट उद्योजगता पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट पुणे २०२४ हे पुरस्कार कारखान्यांस मिळाले असल्याचे  बाजीराव जी. सुतार यांनी सांगितले.

          . .


 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!