banner ads

लहान मुलांना स्मार्ट फोन देणे आरोग्याच्या दृष्टीने घातक -

kopargaonsamachar
0

 लहान मुलांना  स्मार्ट फोन देणे  आरोग्याच्या दृष्टीने घातक -  आ.आशुतोष काळे


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवीन शोध लागत आहेत या तंत्रज्ञानाचा परिणाम म्हणून आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला असून हा स्मार्ट फोन पालकांबरोबरच या लहान मुलांच्या हातात देखील दिसू लागला आहे. याची कारणे जरी वेगवेगळी असेल तरी लहान मुलांना  स्मार्ट फोन देणे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे त्याचा तोटा आपल्याला भविष्यात भोगावा लागू शकतो. आपला देश महासत्तेकडे वाटचाल करीत असून शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालक हे आपल्या देशाचे उद्याचे भविष्य आहे. याची जाणीव ठेवून पालकांमध्ये लहान मुलांच्या संगोपनाविषयी जागरूकता निर्माण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे एकात्मीक बालविकास सेवा योजना प्रकल्प तसेच ‘कोपरगाव आरंभ’ च्या अंतर्गत टाकळी गटाच्या ‘धमाल मेळाव्याचे’  आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून ‘धमाल मेळाव्याचे’ उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी आ.आशुतोष काळे यांचे ‘धमाल मेळाव्यात’ आगमन होताच चिमुकल्या विद्यार्थिनींनी त्यांचे औक्षण केले.

पुढे बोलताना आ.आशुतोष काळे म्हणाले की, नवनवीन तंत्रज्ञान जेवढे आपल्या गरजेचे आहे तेवढाच आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. एकात्मीक बालविकास सेवा योजना प्रकल्प तसेच ‘कोपरगाव आरंभ’ हा उप्रकम अत्यंत स्तुत्य उपक्रम असून या माध्यमातून बालवयातच मुलांवर चांगले संस्कार होणार आहेत व बालकांचा सर्वांगीण विकास साधला जाणार असल्यामुळे निश्चितपणे चांगले विद्यार्थी घडणार आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांनी आपली जबाबदारी ओळखून योग्य पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडावे व आपण देशाचे भविष्य घडवत आहोत याची नेहमी जाणीव ठेवावी असे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.  

याप्रसंगी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत या धमाल मेळाव्यात बालकांच्या शारीरिक व बौद्धिक वाढीसाठी विविध प्रकारचे मॉडेल मांडण्यात आले होते. आ.आशुतोष काळे यांनी या मॉडेलची पाहणी करून चिमुकल्यांशी  संवाद साधत  त्यांचा उत्साह वाढविला. यात शून्य ते ६ वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी पाण्याचे खेळ,भविष्याचे झाड,मेंदूचे जाळे,खेळ कोपरी,साप-सीडी,सह आदी मॉडेल्स मांडण्यात आले होते त्याचे आ. आशुतोष काळे यांनी कौतुक केले. या प्रसंगी महिला बालकल्याण अधिकारी रुपाली धुमाळ,सरपंच सौ."  रोकडे,डॉ.अनिकेत खोत,उपसरपंच भास्करराव काळे, ग्रामसेवक किरण राठोड तसेच सर्व अंगणवाडी सेविका शिक्षकेतर कर्मचारी माता-पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!