banner ads

रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे कार्य प्रेरणा देणारे -- सुमित कोल्हे

kopargaonsamachar
0

 रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे कार्य  प्रेरणा देणारे -- सुमित कोल्हे


रोटरी क्लब कोपरगांव सेंट्रल कडून आटा चक्कींचे वाटप
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
रोटरी क्लब ऑफ सेंट्रल या जगभरातील सेवाभावी सेस्थेचे कार्य महान असुन सर्व स्थरातील लोकांसाठी या संस्थेकडून होत असलेले कार्य हे नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे असते. दातृत्वाच्या बाबतीत रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रलचे सर्व पदाधिकारी व सदस्य समाजकारणात नेहमीच पुढे असतात.  छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या  जयंती निमित्ताने दोन गरजु संस्थांना आटा चक्कीचे वाटत होत आहे, ही बाब भुषणावह आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त   सुमित कोल्हे यांनी केले.

श्री कोल्हे यांचे हस्ते, रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रलच्या वतीने एकलव्य आदिवासी आश्रम शाळा , टाकळी व श्री जलाराम बाप्पा अन्नछत्र, दत्तपार, कोपरगांव या दोन संस्थांना दोन आटा चक्कींचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्री कोल्हे पमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी क्लबचे अध्यक्ष राकेश  काले, हृदय रोग तज्ञ डॉ.डी. एस. मुळे, चार्टर्ड अकौंटंट श्री कुलकर्णी, जलाराम अन्नछत्राचे पटेल परीवार, शहा, ठक्कर, जानी, जोबनपुत्रा, सर्वेया, कोटक गुजराथी, आदी परीवार, रोटरी क्लबचे सचिव विशाल  आढाव तसेच रोटरी क्लबचे सदस्य रोहीत वाघ, डॉ. विनोद मालकर, विरेशअग्रवाल , अनुप पटेल, अमर नरोडे, हर्षल  दोशी , इम्राण सय्यद, डॉ. महेंद्र गवळी, आश्रम शाळेचे  आण्णा टकले, मिरा जोशी , शिक्षक  आणि विद्यार्थी  उपस्थित होते.
     प्रारंभी अध्यक्ष काले म्हणाले की रोटरी क्लब ही जगात १२० वर्षांची  जुनी सेवाभावी संस्था असुन जगात ४६००० शाखा  असुन १२ लाख सदस्य आहेत.  कोपरगाव  आणि पंचक्रोशी  मध्ये रोटरी क्लबचे मार्गदर्शक  व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांच्या प्रेरणेतुन वृक्ष लागवड, आरोग्य  शिबिरे , स्वच्छता मोहिम, गरजु विद्यार्थ्यांना गणवेश  व शालेय  साहित्यांचे वाटप इ त्यादी विधायक कामे केली जातात.    

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!