banner ads

दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली

kopargaonsamachar
0

    साईंची शिर्डी हत्याकांडानं हादरली
कोपरगाव / शिर्डी   ( लक्ष्मण वावरे )

दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली असून दोन साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडलीय यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले तर दोघांचा या घटनेत मृत्यू झालाय  एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहे यात शिर्डी पोलिसांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.


शिर्डीत तिघांवर चाकूने वार झाल्याने शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे.सुभाष साहेबराव घोडे , साई संस्थान कर्मचारी घटना घडली कर्डोबा नगर चौक , नितीन कुष्णा शेजुळ ,साई संस्थान कर्मचारी घटना घडली साकुरी शिव तर कृष्णा देहरकर  रा.श्रीकृष्णानगर यांच्यावर  लोणीतील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. शिर्डीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे चित्र बघायला मिळत असून , ग्रामस्थांनी घटनेची माहिती दिल्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात सांगून त्या घटनेकडे दुर्लक्ष केलं यामुळेच पुढील घटना वाढल्या असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं असून शिर्डी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केलीय


दरम्यान    माजी खासदार सुजय विखे पाटलांनी शिर्डीला साई संस्थांच्या रुग्णालयात येत नातेवाईकांची भेट घेतली असून ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात म्हणून माहिती दिली त्यावर आणि पोलिसांतील दोषी कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा सुजय विखेंनी इशारा दिला असून  तात्काळ आरोपींना अटक करण्यात येईल अशी देखील ग्वाही सुजय विखे पाटलांनी दिली आहे.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!