banner ads

परशराम साबळे "डॉक्टरेट ऑफ ग्रामीण शिक्षण" या पदवीने सन्मानित

kopargaonsamachar
0

 परशराम साबळे "डॉक्टरेट ऑफ ग्रामीण शिक्षण" या पदवीने सन्मानित



कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

कोपरगाव तालुक्यातील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम रामनाथ साबळे यांना जॉर्जिया डिजिटल युनिव्हर्सिटी युएसएच्या पदवीदान समारंभात "डॉक्टरेट ऑफ ग्रामीण शिक्षण" या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.


सविस्तर वृत्त असे की, परशराम साबळे यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील मुला मुलींना उच्च प्रतीचे व्यवसायीक शिक्षण मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची मान्यता घेत वेगवेगळे व्यवसाय शिक्षण सुरू केलेले आहे तर ग्रामीण भागातील मुला मुलींना इंग्रजीतून प्राथमिक शिक्षण मिळावे या उद्देशाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली असून आज संस्थेतील अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून देश-विदेशात नाव उंचावत असून या सर्वांची दखल घेत 


अनेक राष्टीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी साबळे यांचा अनेक पुरस्कारांनी गैरव केला आहे या सर्वांची दखल घेत शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या यूएसए येथील जॉर्जिया डिजिटल युनिव्हर्सिटीचा पदवीदान समारंभ शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी आग्रा येथील रॉयल सरोवर पोर्टिका या तारांकित हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटा संपन्न झाला. यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जगभरातील अनेक मान्यवरांना डॉक्टरेट या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.


या समारंभात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम  साबळे यांना "डॉक्टरेट ऑफ ग्रामीण शिक्षण" या मानद पदवीने युनिव्हर्सिटीच्या सर्वेसर्वा मिस लुना, खासदार पुरुषोत्तम खंडेलवाल, मिस इंडिया सिमरन आहूजा आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते तसेच संस्थेचे रजिस्टर बापूसाहेब डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.



साबळे यांना डॉक्टरेट ऑफ ग्रामीण शिक्षण या मानद पदवीने गौरवण्यात आल्याबद्दल ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे, बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था, कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विशाल धारणगावकर, साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य विजय जाधव यांच्यासह सचिव सुचित्रा साबळे, निलेश देवकर,जनार्दन सुपेकर, संपदा चरमळ आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!