कोपरगाव येथे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४८ वी जयंती साजरी.
कोपरगाव(लक्ष्मण वावरे )
राष्ट्रीय चर्मकार महासंघ संचालित शहर व तालुका चर्मकार संघ यांचे वतीने कोपरगाव येथे श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४८ वी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शना खाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपराव कानडे यांचे नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कोपरगाव: छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची भव्य अशी प्रतिमा उभारून प्रतिमा पूजन व पालखी पूजन सौ.व श्री.किसनराव कानडे यांचे हस्ते करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पुष्पहार घालून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या मिरणुकीत चर्मकार महिलांचे टाळ व लेझीम पथक आणि चिमुकलीने सादर केलेले लाठीकाठी प्रात्यक्षिक हे प्रमुख आकर्षण ठरले.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बसस्थानक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेपुतळा चौक, गोदावरी पेट्रोल पंप, मार्केट यार्ड, जुना टाकळी नाका, समाजमंदिर अशी भव्य पालखी मिरवणूक झाली. त्यानंतर रविदास भवन समाज मंदिर येथे जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. देवीदास उकिरडे महाराज यांनी चौदाव्या शतकात समतेचे पुरस्कर्ते श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या महान कार्याचे महत्व प्रवचनाद्वारे विषद केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात महाप्रसादाचे मानकरी कल्पना सुनील राजभोज, सौ अश्विनी व डॉ दिनेश बोबडे यांचा तसेच समाजातील गुणवंतांचा शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये आय टी आय मध्ये देशात द्वितीय व राज्यात प्रथम आलेल्या प्रविण राजेंद्र ईल्हे तसेच टाळ व लेझीम पथकातील सर्व सहभागी भगिनींचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच परंपरेप्रमाणे पुढील वर्षांच्या महाप्रसादाकरिता इच्छुकांच्या नावातील नऊ पैकी एक चिठ्ठी काढत भाग्यवान ठरलेल्या सौ व श्री भाऊसाहेब कानडे तसेच उपस्थित पत्रकार यांचाही सत्कार करण्यात आला
त्यानंतर प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष अशोक वाकचौरे, शशिकांत थोरात,जालिंदर वाकचौरे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे मा.व्हा चेअरमन रमेश घोडेराव राष्ट्रीय चर्मकार महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, उत्तर महाराष्ट्र महीला आघाडी अध्यक्षा मनिषा पोटे, समाजातील ज्येष्ठ माजी तहसीलदार डी. आर. दुशिंग, भाऊसाहेब कानडे, वारीचे सरपंच सतिश कानडे, सौ. उषा दुशींग ,संजीवनी उद्योग समुहाचे पराग संधान नगरसेवक रविंद्र पाठक,नगरसेवक दिपक वाजे, नगरसेवक मंदार पहाडे,अनिरुद्ध काळे, फकीर कुरेशी, नगरसेवक संदीप पगारे, रमेश गवळी, इम्तियाज अत्तार,प्रफुल्ल शिंगाडे,दिपक गायकवाड,जितेंद्र रनशूर , विजय त्रिभुवन प्रकाश दुशिंग सागर आहेर आदी मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे यांनी तर सूत्रसंचालन वसंतराव थोरात यांनी तसेच आभार तालुका अध्यक्ष माधवराव पोटे व शहर अध्यक्ष गणेश कानडे यांनी मानले.तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी समाज मंदिराकरिता वॉल कंपाउंड- कमान काम पुर्ण करुन नव्याने दहा लक्ष रुपये मंजूर केल्या बद्द्ल आमदार काळे यांच्या अभिनंदनाचा ठराव करुन संयोजकांनी आभार मानले तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या काळात समाज मंदिर बांधले होते ती आठवण करत संजीवनी उद्योग समुह दरवर्षी साखर पोते देतात त्याबद्दल बिपिन दादा कोल्हे,विवेक कोल्हे यांचे संयोजकांनी आभार मानलेकार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशींग, संजय पोटे, देविदास कानडे, राकेश धाकतोडे, संतोष कानडे, मयूर कानडे, संदेश कानडे, संतोष दळवी, संतोष बारसे, संदीप बारसे, गणेश शिंदे, गणेश दळवी, सागर पोटे, संतोष शिंदे, अँड. रमेश दुशिंग, जगनराव कानडे, रमेश मगर , संकेत कानडे, बबलू कानडे, अनिल कानडे, दत्तात्रय पठाडे, योगेश मगर, गोरक्षनाथ कानडे, महेश कानडे, संदेश कानडे, भैय्या कानडे, आदींनी परिश्रम घेतले.टाळ व लेझीम पथकामध्ये सौ. स्नेहा कानडे, सौ. जयश्री कानडे, सौ. मोनिका दुशिंग, पुजा जाधव,सौ.उषा कानडे, सौ. सुरेखा कानडे, सौ. शोभा कानडे, सौ.रुपाली बनसोडे, उषा कानडे,साईश्री कानडे, उत्कर्षा कानडे, कोमल कानडे, अक्षरा कानडे,श्रद्धा जाधव, श्रेया जाधव कु.ईश्वरी कानडे, सौ.संगिता कानडे, सौ.मिराबाई दुशिंग,सौ. लिलाताई पोटे, गिरीजा कानडे आदींनी सहभाग घेतला होता.
ईश्वरी अशोक कानडे हिने यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर सुंदर नृत्य सादर केले तर कु आराध्या दत्ता दुशिंग व दिव्या दत्ता दुशिंग यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर गीत सादर केले
याप्रसंगी मारूती सरवार ,रमेश गायित्रे, डॉ. सातपुते, माधवराव पोटे मेजर, कैलास सातपुते, संजय सरवार, बाळासाहेब सोनटक्के, बबनराव पोटे, अण्णासाहेब बारसे, जगणराव वाकचौरे, दत्तात्रय गायित्रे, मच्छिंद्र आहेर, सोमनाथ कुऱ्हाडे, गुलाब धाकतोडे, नितिन कानडे, दिपक कांबळे, राजेंद्र दळवी, भाऊसाहेब धाकतोडे, राजेंद्र पोटे, पवार , भिमा भागवत, पोपटराव शिंदे, संजय कानडे, आदित्य कानडे, नवनाथ कानडे, सोमनाथ लोहकरे, वसंत भागवत ,मनोज कानडे, चंद्रकांत कानडे, कचरू लोहकरे, स्वप्निल कडू, बाबुराव सातपुते, संजय सातपुते,अशोक कानडेसर,राजेंद्र पोटे , भाऊसाहेब कडु, शंकर कडु,संजय कानडे,ज्ञानेश्वर कडु, सोमनाथ लोहकरे ,अशोक लोहकरे, रघुनाथ लोहकरे, भाऊसाहेब लोहकरे आदींसह शहर व तालुक्यातील समाज बांधव व महीला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते




.jpg)




