बेशिस्त वाहनचालकांना पोलीसांचा दणका! २९ हजाराची वसुली
कारवाईसाठी स्वतः पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
बेशिस्त वाहन चालकांना कोपरगाव शहर पोलीसांनी चांगलाच दणका दिला असून या कारवाईसाठी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे स्वतः रस्त्यावर उतरले. गुरुवारी सकाळी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळ मेन रोडवर पोलिसांनी वाहनांची कागदपत्र तपासणी केली.
ज्यांच्याकडे वाहनांचे कागदपत्र आहे आणि वाहतूक नियमांचे पालन करत आहे त्यांना सोडण्यात आले. आणि ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट ,अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ६३ बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून २९ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय.



.jpg)




