गौतम बँकेच्या व्हा.चेअरमनपदी सुनील डोंगरे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रभागी असणाऱ्या गौतम सहकारी बँकेच्या व्हा.चेअरमनपदी सुनील भास्करराव डोंगरे यांची निवड झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी दिली आहे.
गौतम सहकारी बँकेचे विद्यमान व्हा.चेअरमन बापूराव जावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सुनील डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षीय अधिकारी नामदेव ठोंबळ तथा सहाय्यक निबंध सहकारी संस्था कोपरगाव यांच्या उपस्थितीत व्हा.चेअरमनपदासाठी निवडणूक संपन्न झाली. यावेळी व्हा.चेअरमनपदासाठी सुनील डोंगरे यांच्या नावाची सूचना जेष्ठ संचालक राजेद्र ढोमसे यांनी मांडली.
गौतम सहकारी बँकेच्या व्हा.चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल बँकेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
यावेळी बँकेचे चेअरमन संजय आगवण, मावळते व्हा.चेअरमन बापूराव जावळे व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्हा.चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सुनील डोंगरे म्हणाले की, प्रगतीपथावर असलेल्या गौतम सहकारी बँक केवळ आर्थिक संस्थाच नाही, तर सामाजिक आणि ग्रामीण जीवनाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा आधार आहे. गौतम बँकेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांची आर्थिक गरजा पूर्ण करून खासकरून छोटे आणि मध्यम व्यवसायिक, शेतकरी वर्ग आणि सामान्य नागरिक यांना आर्थिक साहाय्य देऊन विश्वसनीय संस्था म्हणून नावलौकिक कमविला आहे. मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी विश्वासाने माझ्यावर दिलेली बँकेच्या विकासाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वाना सोबत घेवून यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.




.jpg)




