बहादराबाद सोसायटीच्या चेअरमन पदी नवनाथ पाचोरे,व्हा .चेअरमनपदी रविंद कुरकुटे यांची निवड
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगांव तालुक्यातील बहादराबाद येथिल बहादराबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी नवनाथ पाचोरे,व्हा .चेअरमनपदी रविंद कुरकुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बहादराबाद वि. का. सोसायटीची निवडणूक एप्रिल २०२२ रोजी संपन्न झाली होती. त्यात भाजपा प्रणित कोल्हे गटाच्या सर्व उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी पॅनल अंतर्गत ठरल्याप्रमाणे पदाधिकारी यांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा ठरविण्यात आला होता. त्यानुसार मावळते चेअरमन साहेबराव पाचोरे व व्हा.चेअरमन रामनाथ पाचोरे यांनी.आपापल्या पदांचा राजीनामा दिला .
त्यानुसार सहाय्यक निबंधकांच्या आदेशान्वये निवड प्रक्रिया पार पडली यावेळी चेअरमन पदासाठी नवनाथ पाचोरे यांच्या नावाची सूचना बाळासाहेब पाचोरे यांनी आणली त्यास सचिन पाचोरे यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हा.चेअरमन रविंद्र कुरकुटे यांच्या नावाची सुचना निवृत्ती पाचोरे यांनी मांडली त्यास सुशिला पाचोरे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी सहकार अधिकारी श्री.नेरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले तसेच सोसायटीचे सचिव सुनिल पाडेकर यांनी सहाय्यक निर्णय अधिकारी म्हणून निवडीस सहाय्य केले.
यावेळी बहादराबादचे कर्तव्यदक्ष पोलिस पाटील आप्पासाहेब पाचोरे यांचा सेवापूर्ती निमित्त यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकायांचे संजिवनी उद्योग समुहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे,माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले .
सदर प्रसंगी मा चेअरमन साहेबराव पाचोरे ,पोलिस पाटील आप्पासाहेब पाचोरे ,दत्तात्रय का.पाचोरे ,दत्तात्रय रा. पाचोरे ,नवनाथ कों.पाचोरे,माजी सरपंच विक्रम पाचोरे,सरपंच अश्विनी पाचोरे,रामनाथ को.पाचोरे,शिवनाथ पाचोरे,अरुण पाचोरे,उल्हास पाचोरे ,अण्णासाहेब पाचोरे,काकासाहेब पाचोरे ,गोवर्धन पाचोरे,पाटीलबा पाचोरे,रवींद्र कुरकुटे,गीताराम पाचोरे,रामनाथ भा.पाचोरे ,निलेश पाचोरे ,बाळासाहेब श.पाचोरे ,संदीप पाचोरे,संजय पाचोरे ,बाळासाहेब सो.पाचोरे,उपसरपंच आरती पाचोरे ,सुशीलाबाई पाचोरे ,ग्रामसेवक अनिता दिवे मॅडम,संगणक परिचालक प्रविण घारे,सचिव सुनील पाडेकर (सहाय्यक निवडणूक अधिकारी),सुनील पाचोरे ,अमोल पाचोरे ,सुभाष पाचोरे ,गणपत कोल्हे,निवृत्ती पाचोरे ,ह.भ.प.मयूर महाराज पाचोरे ,कैलास पाचोरे ,मनीषा पाचोरे ,श्रद्धा पाचोरे,प्रसाद पाचोरे,राजेंद्र पाचोरे,ज्ञानदेव पाचोरे आदि ग्रामस्थ उपस्थित होते .









