banner ads

संजीवनीच्या स्पंदन जाधव व सर्वेश शेळकेला राष्ट्रीय खेळाडूचा बहुमान

kopargaonsamachar
0

 संजीवनीच्या  स्पंदन जाधव व सर्वेश शेळकेला  राष्ट्रीय  खेळाडूचा बहुमान



कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

 संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी अकॅडमीच्या स्पंदन प्रकाश  जाधव याची १७ वर्षे  वयोगटात तर सर्वेश  तुशार शेळके याची १४ वर्षे  वयोगटांतर्गत मुलांच्या  ६८ व्या राष्ट्रीय शालेय  क्रीडा सॉफ्टबॉल स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या  संघांमध्ये निवड झाली आहे.
 स्पंदन व सर्वेश  यांच्या उत्कृष्ट  क्रीडा कौशल्यामुळे  महाराष्ट्राच्या  संघांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने त्यांना  राष्ट्रीय  खेळाडू होण्याचा बहुमान मिळाला आहेे, या स्पर्धा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्याात होणार आहे, अशी  माहिती स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
 पत्रकात पुढे म्हटले आहे की क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र  राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपुर यांच्या वतीने महाराष्ट्रातील  आठ विभागामधुन आलेल्या १७ वर्षे  वयोगटांतर्गत २०९  खेळाडूंमधुन राष्ट्रीय  सॉफ्टबॉल स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या  सॉफ्टबॉल संघाच्या १६ खेळाडूंची निवड झाली. तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र  राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने महाराष्ट्रातील  आठ विभागामधुन आलेल्या १४ वर्षे  वयोगटांतर्गत २०७ खेळाडूंमधुन राष्ट्रीय  सॉफ्टबॉल स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या  सॉफ्टबॉल संघाच्या १६ खेळाडूंची निवड झाली. या निवड चाचण्यांमध्ये स्पंदन व सर्वेशने  उत्कृष्ट  खेळाचे प्रदर्शन  केले व त्यांना महाराष्ट्राचे  प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांच्या  निवडीचा जिल्हा, विभागीय आणि राज्य पातळी असा प्रवास झाला.

संजीवनीमध्ये प्रत्येक खेळाचे राष्ट्रीय  पातळीवरट्रॅक  रेकॉर्ड असणाऱ्या  कोचेसची नेमणुक, भव्य मैदाने, खेळाचे संपुर्ण साहित्य आणि खेळाडूंना प्रोत्साहन, या सर्व बाबींमुळे संजीवनीचे खेळाडू विविध पातळीवर संजीवनीचा क्रीडा क्षेत्रात दबदबा निर्माण करीत आहेत.
 स्पंदन व सर्वेशच्या या यशाबध्दल संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ स्कॅुल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना राष्ट्रीय  स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्या शैला  झुंजारराव व स्पोर्ट डीन  विरूपक्ष रेड्डी, कोच अक्षय येवले, मुस्तकिम पिर्जाडे यांचेही अभिनंदन केले. फोटो: स्पंदन जाधव  व सर्वेश शेळके
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!