banner ads

जिल्हास्तरावर कुणाल कवडे करणार कोपरगाव चे नेतृत्व

kopargaonsamachar
0

 जिल्हास्तरावर कुणाल कवडे करणार कोपरगाव चे नेतृत्व 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

 कोपरगाव तालुका गणित व विज्ञान ५२ व्या प्रदर्शनाचे संवत्सर येथे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी या गटात गौतम पब्लिक स्कूलच्या कुणाल कवडे याने 'इको फ्रेंडली अर्थन पॉट' हे उपकरण सादर करत या गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची दिनांक १७ जानेवारी ते १८ जानेवारी रोजी अकोले येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली.


या गणित-विज्ञान प्रदर्शनामध्ये इ.१ ली ते ५ वी, इ.६ वी ते ८ वी व इ.९ वी ते १२ वी असे तीन गट निहाय तब्बल २०० उपकरणे ठेवण्यात आली होती. शाळेच्या वतीने प्राचार्य नूर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हाऊस मास्टर्स प्रकाश भुजबळ, राजेंद्र आढाव, उत्तम सोनवणे व नासिर पठाण यांच्या हस्ते कुणाल कवडे याचा प्रमाणपत्र व विजयी करंडक देऊन सन्मान करण्यात आला. 

सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व कुणाल कवडे याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ.चैताली काळे, प्राचार्य नूर शेख, मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी गौतम पब्लिक स्कूलच्या सर्व वैज्ञानिकांना प्रशिक्षित करण्यात शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक राजेंद्र आढाव, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, नासिर पठाण, प्रतिभा बोरनार, प्रतीक्षा देशमुख, निखिल शेळके आदी शिक्षक तसेच कॅम्पस सुपरवायझर सुनील सूर्यवंशी यांनी मोलाची कामगिरी बजावली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!