मजुराची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )शहाजापूर कोळपेवाडी येथील ऊसतोड मजूर चिंतामण लाला सोनवणे याची कोपरगाव येथील मे .जिल्हा व सत्र न्यायालयाने सेशन्स केस नंबर ९८ / २०१९ मधील बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली .
शहाजापूर कोळपेवाडी येथील जुने गावठाण भागातील फिर्यादीचे घरात घुसून आरोपीने बलात्कार केला म्हणून भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६ अन्वये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांचे कडे आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल झाली होती त्यावरून पोलीस स्टेशनने दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले .या खटल्यात फिर्यादीतर्फे सात साक्षीदार तपासले सरकारतर्फे अॕड.ए.एल. वहाडणे यांनी काम पाहिले आरोपीतर्फे अॕड दीपक दादाहरी पोळ यांनी जामीना पासून ते अखेर पर्यंत प्रकरणाचे काम पाहिले अॕड पोळ यांनी तपासातील व पुराव्यातील विसंगती उलट तपासातील उनिवा कोर्टाचे निदर्शनास आणल्या कागदोपत्री व तोंडी पुरावा व उभय बाजूंचा युक्तिवाद ऐंकुन मा जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.