banner ads

कायदा लागू असतानाही कोपरगावात वारंवार घडतोय तोच गुन्हा

kopargaonsamachar
0

 कायदा लागू असतानाही कोपरगावात वारंवार  घडतोय  तोच गुन्हा  


पाच आरोपींवर गुन्हे दाखल 

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा(law to stop cow slaughter) लागू असताना कोपरगाव येथिल  ठराविक भागात मात्र शनिवारी  काही गायींची कत्तल झाल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर  पोलीस ठाण्यात ५ आरोपींवर गुन्हा दाखल झाला असुन १ लाख ६८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती  पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली .




गेल्या पाच सहा महिन्या पूर्वीच आयशा कॉलनी ,संजय नगर भागात अवैध कत्तली सुरू असल्याच्या कारणाने हिंदुत्ववादी संघटनांनी सदर गो वंश कत्तली थांबवावी यासाठी आंदोलन छेडले होते.सदर अवैध अतिक्रमणे व गौवंश हत्या थांबवावी असा इशारा दिल्यामुळे कोपरगाव नगरपालिकेने पोलीस बंदोबस्ता मध्ये अवैध अतिक्रमणे व ही कत्तलखाणे बंद केली होती 
परंतु आज तीन चार महिन्यानंतरही हे कत्तलखाने अगदी जोमाने व राजरोसपणे  सुरू आसल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठान्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली गोपनीय माहिती नुसार पाच विविध ठिकाणी छापे मारण्यात आले .



ह्या मध्ये महेबूब कॉलनी,संजय नगर येथे पंधरा हजार रुपये किमतीचे गोवंश जातीचे दोन जनावरे, तसेच आयशा कॉलनी संजय नगर या ठिकाणी साठ हजार किमतीचे तीन गोवंश जातीचे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले मिळून आले,, त्याच प्रमाणे हाजी मंगल कार्यालय, आयशा कॉलनी जवळ पत्राच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल केलेली होती, त्या ठिकाणी जनावरांचे पन्नास किलो मांस व वीस कातडी ,वजन काटा व कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण सतरा हजार सातशे किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.,त्याचप्रमाणे हाजी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे आयशा कॉलनी येथे जनावरांची कत्तल केलेली होती त्या ठिकाणी जनावरांचे चाळीस किलो गोमांस दहा जनावरांची कातडी व कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे,, तर आयशा कॉलनी संजय नगर कोपरगाव येथे मटन मार्केट या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी गोवंश जातीचे चारशे पंचवीस किलो गोमांस व कातडी व कत्तलीचे साहित्य असा एकूण ६५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदरचे गोमास व कातडी सॅम्पल राखून  बाकी गोमांस व कातडीची विल्हेवाट लावण्याकरता नगरपालिका कोपरगाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे 

एकंदरीतच  दिनांक १८ जानेवारी रोजी आयशा कॉलनी, संजय नगर कोपरगाव परिसरात व मटन मार्केट या ठिकाणी कोपरगाव शहर पोलिसांनी छापा टाकून ६ गोवंश जनावरांची सुटका केली आहे,,५२५ किलो गोमांस व ३० जनावरांची कातडी व कत्तलीचे साहित्य असा एकूण १ लाख ६८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये आरोपी तोहीद कुरेशी ,,सत्तार गफार कुरेशी , पापा फकीरा मोहम्मद कुरेशी , सोनू मज्जू कुरेशी , शबीर बशीर कुरेशी एकूण ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करन्यात आला आहे,सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक  वैभव कलुबर्मे,उप-विभागिय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके,    किशोर पवार,पोलिस उपनिरीक्षक भुषण हंडोरे व तेरा पोलिस कर्मचारी व दोन महीला पोलिस यांनी   केली. 
दरम्यान  कोपरगाव नगरपालिका या अवैध अतिक्रमणास व कत्तल खाण्यास जबाबदार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे या ठिकाणी संबधीत अधिकारी का लक्ष घालत नाही. यामागे काय गौड बंगाल आहे. ह्या गोहत्या चालू असताना कोपरगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याची साधी माहितीही असू नये याबाबत शंका निर्माण होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!