कोल्हे कुटुंबाने राजकीय सामाजिक क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय -- राज्यपाल हरिभाऊ बागडे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोल्हे कुटुंबाने राजकीय सामाजिक क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय आहे.विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या मनाने वरिष्ठ नेत्यांच्या शब्दाला सन्मान दिला आणि एका अर्थाने राजधर्म जपला हे दखल घेण्यासारखे आहे.आपल्याला काही मिळावे या पेक्षा काही मिळो अथवा ना मिळो आपण देशाला काय योगदान देऊ शकतो याचा विचार करणारे लोक आयुष्यात पुढे जातात असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांनी व्यक्त केले.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे कोपरगाव दौऱ्यावर असताना येसगाव येथे कोल्हे निवासस्थानी भेट दिली असता कोल्हे कुटुंबाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्याशी असणाऱ्या जुन्या आठवणी आणि ऋनानुबंध यांना उजाळा या निमित्ताने मिळाला.बिपीनदादा कोल्हे,नितीनदादा कोल्हे,स्नेहलता कोल्हे, अमित कोल्हे,युवानेते विवेक कोल्हे आदींसह कोल्हे कुटुंबातील सदस्यांनी हरिभाऊ बागडे यांचे स्वागत केले.
कोल्हे निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून हितगुज साधले यावेळी कौटुंबिक संवाद साधताना हरिभाऊ बागडे म्हणाले आपला देश प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी नव्या पिढीला उभारी देण्याची गरज आहे.एक पिढी आपले कार्य आणि कर्तृत्व पूर्ण करत असताना दुसऱ्या पिढीला तयार करणे हे देखील गरजेचे आहे अन्यथा सक्षमता कशी येणार असे मत माझे आहे.आज स्व.कोल्हे साहेब असते तर त्यांनी देखील हीच मांडणी केली असती कारण राष्ट्र घडविण्यासाठी सामूहिक शक्तीची गरज आहे.







