banner ads

गोदावरीचे दुध संघाचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

kopargaonsamachar
0

 गोदावरी दुध संघाचे  सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण


आधुनिक तंत्रज्ञानाने दूध संघात नवीन क्रांति



कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने संघाने शेतकरी दूध उत्पादकांच्या हितासाठी नव्या आधुनिक विविध प्रकल्पांचा प्रारंभ २० जानेवारी सोमवारी सकाळी दहा वाजता संघाच्या कार्यस्थळावर होणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी दिली.

सर्व विविध प्रकल्पांचा प्रारंभ तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी कर्मचारी वसाहतीच्या बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ 
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष मिनेश शहा, आमदार प्रा. रमेश बोरणारे ,आमदार आशुतोष  काळे, आमदार अमोल खताळ ,आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते ,यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती  गोदावरी खोरे दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर पत्रकार परिषदेत राजेश परजणे यांनी  दिली.
ते म्हणाले दूध धंद्यातील वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी व दूध उत्पादक तसेच शेतकरी विक्रेते ग्राहक यांच्या हितासाठी गोदावरी दूध संघाने अनेक आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून सहकारी दूध संघात नवीन क्रांति केली आहे दूध संघाच्या खर्चात बचत करण्यासाठी वीज निर्मितीचे पाऊल उचलून तब्बल पन्नास  टक्के वीज बिल वाचवण्यात आले आहे .दीड मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे सूक्ष्म निर्जंतुकीकरण करून ग्राहकांना अधिक दर्जेदार दूध देण्यासाठी नव्या मिल्क क्लेरिफायर मशिन बसवण्यात आली आहे जुन्या पारंपरिक  पद्धतीने  खवा बनवण्याच्या पद्धतीला पूर्णविराम देत खव्याच्या दर्जामध्ये अधिक सकसपणा यावा तसेच कमी वेळेत योग्य पद्धतीने एकसारखा खवा तयार व्हावा म्हणून संघाने कन्ट्यून्युअस खवा मेकिंगची आधुनिक मशीन बसवली आहे अवघ्या तासात खवा बनवला जाणार आहे तसेच नव्या पद्धतीचे जलशुद्धीकरण व पाणी साठवण्याचे टॅंक बसवून संघाची संपूर्ण दूध प्रकल्पाची प्रक्रिया आधुनिक केली आहे सहकारी क्षेत्रातील गोदावरी दूध संघ हा एकमेव दूध संघ आहे की तो आधुनिकीकरणात   अव्वल आहे.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!