banner ads

त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही आ.आशुतोष काळेंची अधिकाऱ्यांना तंबी

kopargaonsamachar
0

 त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही आ.आशुतोष काळेंची अधिकाऱ्यांना तंबी


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

ग्रामिण  भागातील रस्ते, पाणी, वीज, शेती आदी विषयांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच कोपरगाव शहरातील कोपरगाव नगरपरिषद व विविध विभागाचे प्रश्न देखील वेळेत कशी सुटतील यासाठी माझे प्रयत्न राहतील त्याला सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी देखील आपली जबाबदारी ओळखून शंभर टक्के योगदान देणे गरजेचे आहे.जनतेच्या तक्रारी शासकीय अधिकाऱ्यांनी समजावून घेवून या तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करुन त्यांचे समाधान झाले पाहिजे.ज्या नागरिकांच्या अडचणी सुटण्यास विलंब होत असेल अशा नागरिकांनी  जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. जनतेचा सेवक या नात्याने जनतेच्या समस्या  सोडविणे हे माझे कर्तव्य असून या कर्तव्य भावनेतून नागरिकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा न घेता व कर्तव्यात कसूर न करता जनतेचे सेवक आहात याची जाणीव ठेवून नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवावे अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी जनता दरबारात शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोपरगाव मतदार संघातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी मंगळवार (दि.०७) रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी या जनता दरबारात आ. आशुतोष काळे यांनी समस्या घेवून आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या समजावून घेत सबंधित अधिकाऱ्याला समक्ष समोरासमोर उभे करून नागरिकांच्या समस्यांचे निराकारण केले. आ. आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरून सर्वच अधिकारी वाईट नसतात मात्र काही अधिकारी कामचूकार असतात त्यामुळे अशा अधिकाऱ्यांनी नागरिकांना त्रास देऊ नये व चुकीचे काम देखील करू नये.
यापुढील काळात असे अधिकारी कामचुकारपणा व चुकीचे काम करतांना आढळून आल्यास त्यांची  गय  केली जाणार नाही असा इशारा आ.आशुतोष काळे यांनी या जनता दरबारात उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.नागरिकांच्या सेवेसाठी तुमची नेमणूक करण्यात आली आहे याची जाणीव ठेवून त्यांची कामे वेळेत झाली पाहिजे याची काळजी घ्या.  . 


या जनता दरबारात तहसीलदार महेश सावंत, गटविकास अधिकारी संदीप दळवी, मुख्याधिकारी सुहास जगताप, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अजय धांडे, उपकार्यकारी अभियंता डी.डी. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे विनोद मेणे, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, गोदावरी डावा तट कालव्याचे उपविभागीय अभियंता पाटील, गोदावरी कालवे जलनि:सारण विभागाचे किरण तुपे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता अशोक लोहरे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, नायब तहसीलदार हेमंत पाटील,  कंटारे, पंचायत समिती कृषी अधिकारी सचिन कोष्टी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ए.एस. तांबे, पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रद्धा काटे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती रुपाली धुमाळ, पंचायत समिती विस्तार अधिकारी  साबळे, बांधकाम विभाग उपअभियंता सी.डी. लाटे, ए.व्ही. लहारे, के.बी. तुपे, एस.आर. दळवी, कनिष्ठ अभियंता अंजली वाघ, मंडळ कृषी अधिकारी एस.के. मलिक, मंडळ अधिकारी भाऊसाहेब कोळगे, सामाजिक वनीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जे. रोडे, वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.जे. पाचरणे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी पी.एस. खेमनर, पशुधन पर्यवेक्षक अंजली येळवंडे, आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!