banner ads

पत्रकाराने विरोधी पक्ष नेता म्हणून काम बजवावे

kopargaonsamachar
0

 पत्रकाराने विरोधी पक्ष नेता म्हणून काम बजवावे


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

महाराष्ट्रातील महायुतीला बहुमत मिळाले आहे यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. एखाद्या सत्ताधारी पक्ष जेव्हा निरंकुश असतो त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून अनेक चुका होण्याची दाट शक्यता असते त्याचे चटके राज्याला,देशाला व जनतेला बसत असतात अशावेळी या सताधार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी पत्रकाराने विरोधी पक्ष नेता म्हणून काम बजावले पाहिजे. जनतेला न्याय देण्याची जबाबदारी पत्रकाराची असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक यदु जोशी यांनी केले.


संजीवनी उद्योग समूह व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आयोजित पत्रकार दिन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य अधिस्वीकृती समिती महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष यदु जोशी हे बोलत होते.

यावेळी युवानेते विवेक कोल्हे,जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, उद्योजक विपुल अग्रवाल, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, ए डी अंत्रे आदी उपस्थित होते.


प्रारंभी विवेक कोल्हे म्हणाले की, पत्रकारितेचे अनेक माध्यम झालेले आहे. पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक आहे. आजची पिढी वाचन संस्कृती पासून दूर गेलेली आहे.शासनाने पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे व त्यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदे केले पाहिजे. तसेच शासनाने पत्रकाराला आर्थिक हातभार लावण्यासाठी लाडके पत्रकार अशी योजना आणली पाहिजे.

यावेळी यदु जोशी म्हणाले की, पत्रकाराला समाजाने जे दिले आहे. ते समाजाला आपण दिले पाहिजे हे आपले कर्तव्य असून पत्रकारिता करत असताना मेहनती शिवाय पर्याय नाही. पत्रकार हा दिसनं गरजेचा नसून पत्रकार वाचला गेला पाहिजे. आपण आपल्या कामाबद्दल निष्ठा व विश्वासार्हता टिकवली पाहिजे. पत्रकार हा समाजासाठी खूप काही करत असतो. आपले कर्तव्य करत असताना आपण आपला स्वाभिमान जपणे ही गरजेचे आहे. आपण आपले विचारांची स्पष्टता कायम ठेवली पाहिजे. तसेच पत्रकाराने राजकारणाकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहिले पाहिजे . यामुळे वाचकांची व पत्रकारांची निराशा होणार नाही असेही शेवटी यदु जोशी म्हणाले
प्रास्ताविक ए.डी अंत्रे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक साहेबराव दवंगे यांनी मानले.




जर्मनी मध्ये दहा हजार नोकऱ्यांची संधी निर्माण झालेली आहे. संजीवनी शिक्षण संस्था ही एक आदर्श शिक्षण संस्था आहे. संजीवनीने स्किल डेव्हलपमेंट कोर्स तसेच ग्रामपंचायत सदस्य ते आमदार- खासदार यांच्यापर्यंत  प्रत्येकाला आपल्या अधिकार व कर्तव्याची जाणीव व्हावी या दृष्टीने प्रशिक्षण व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे. तसेच व्यवहारिक, उपयोगी, क्रियात्मक, अभ्यास सिद्ध, प्रयोगात्मक काम,आभ्यासिक पत्रकारिता कोर्स सुरू करावा
.- यदु जोशी जेष्ठ पत्रकार
 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!