banner ads

रवंदे शाळेत बाल आनंद मेळाव्यात पस्तीस हजारांची उलाढाल

kopargaonsamachar
0

 रवंदे शाळेत बाल आनंद मेळाव्यात पस्तीस हजारांची उलाढाल



कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

पी .एम . श्री . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे येथे नुकताच बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन रवंदे गावचे उपसरपंच ऋषिकेश कदम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे सदस्य गणेश काळे मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांच्या हस्ते पार पडले यावेळी मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते .



यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल उभारणी केली होती त्यात खाऊ भाजीपाला , घरगुती पदार्थ, चहा , कॉफी फळभाज्या, फळे , खाद्यपदार्थ  अशा विविध पदार्थांची दुकाने मुलांनी थाटली होती. शाळेत रांगोळी स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू यांचे एक कलादालन तयार करण्यात आले होते पालकांनी कलादालनाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांनी उभारलेल्या स्टॉलला भेट देऊन वस्तू खरेदी केल्या विद्यार्थी खरेदी विक्रीचा अनुभव आनंदाने घेत होते . विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये एक उत्साह दिसत होता मुलांना व्यवहारिक ज्ञानासाठी असे मिळावे बालवयात घेणे फार गरजेचे आहे असे मत उपसरपंच ऋषिकेश कदम यांनी मांडले या बाल आनंद मेळाव्यात जवळपास 35 हजारांची उलाढाल बालगोपाळांनी खरेदी विक्री करून केली . यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. या मेळाव्याचे सर्वत्र कौतुक पहावयास मिळाले मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!