banner ads

संजीवनी च्या चार अभियंत्यांची रेनाटा प्रिसिझन मध्ये नोकरीसाठी निवड

kopargaonsamachar
0

 संजीवनी च्या चार अभियंत्यांची रेनाटा प्रिसिझन मध्ये नोकरीसाठी निवड

                 


कोपरगांव -

 संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट  विभागाच्या प्रयत्नाने अंतिम वर्षातील  चार नवोदित अभियंत्यांची रेनाटा प्रिसिझन या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत आकर्षक वार्षिक  पॅकेज देवु करून नोकरीसाठी निवड केली. अशा  प्रकारे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे नवोदित अभियंते वयाच्या २२ व्या वर्षी  लाखोंचे वार्षिक  पॅकेज घेण्यास पात्र होत आहे. मागिल वर्षात  टी अँड  पी विभागाच्या प्रयत्नाने उच्चांकी संख्यने नवोदित अभियंत्यांना त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकऱ्या  मिळाल्या होत्या, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

           पत्रकात पुढे म्हटले आहे की रेनाटा प्रिसिझन या विविध वाहन उद्योगांना मेटल व प्लास्टिक मोल्डेड पार्टस् पुरवठा करणाऱ्या  कंपनीमध्ये संजीवनीचे माजी विध्यार्थी अभियंते म्हणुन कार्यरत असुन त्यांचे उत्तम योगदान आहे. या अनुषंगाने  या कंपनीने पुन्हा चालु वर्षी  मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या प्रसाद कैलास आहेर, गितांजली संदिप गाडेकर, करण रामदास वडाळकर व मेकॅनिकल  इंजिनिअरींगच्या आदिनाथ राजेंद्र शिंदे  यांची निवड केली आहे.

       संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांनी सर्व नवोदित अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तसेच मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी चारही नवोदित अभियंत्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डॉ. आर. ए. कापगते, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे प�

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!