कोपरगांव [ लक्ष्मण वावरे ]
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिली जिल्हास्तरीय तपासणी झालेल्या २७२ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ३२६ मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली. निवडणूक निरीक्षक कविथा रामू , निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थिती ही प्रक्रिया करण्यात आली.
कोपरगाव तहसील येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, ईव्हीएम समन्वयक अधिकारी व चंद्रशेखर कुलथे उपस्थित होते.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ३२६ बॅलेट युनिट, ३२६ कंट्रोल युनिट आणि ३५३ व्हीव्हीपॅट यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सोळंके यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.
कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी मतदान केंद्राच्या १२० टक्के प्रमाणात बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १३० टक्के प्रमाणात व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली आहेत. ही यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल येथे ईव्हीएमचे जुळवणीचे काम सुरू करण्यात आले, श्रीमती सोळंके यांनी सांगितले





Great
उत्तर द्याहटवा