ajinky

banner ads

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अंचलगाव, बोलकी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

kopargaonsamachar
0

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अंचलगाव, बोलकी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

खिर्डी गणेश सबस्टेशनला निवेदन

कोपरगाव समाचार :--अंचलगाव सह बोलकी परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अनियमित वीज वितरण आणि लोडशेडिंगच्या समस्येमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. शेतीपंपांना आवश्यक वेळी वीज मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होत असून, नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. याबाबत महावितरणकडे निवेदन देत वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कोणतीही सुचना न देता सबस्टेशन समोर दोन्ही गावांतील शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांसह उपोषणाला बसणार असून होणा-या परीणामास वीजवितरण कंपनी जबाबदार राहील अशा स्वरूपाचे निवेदन अंचलगाव, बोलकी ग्रामस्थांनी दिले.



निवेदनात म्हटले आहे की, परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना वीजपुरवठा ठरलेल्या वेळेनुसार आणि व्यवस्थित मिळत नाही. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीसाठी विजेची आवश्यकता असताना वीज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने रात्रीच्या वेळी कृषी पंप सुरू करावे लागतात. मात्र, त्यावेळीही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.




शेतीसाठी वीज कधी मिळणार याची निश्चितता नसल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे अवघड झाले आहे. परिणामी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आधीच वाढलेला शेतीचा खर्च, त्यात अनियमित वीजपुरवठा आणि लोडशेडिंग यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.


निवेदनात वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या मानवी सुरक्षेच्या प्रश्नाकडेही महावितरणचे लक्ष वेधण्यात आले आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने अथवा अनपेक्षितपणे वीज ये-जा होत राहिल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे शेतकरी व ग्रामस्थांनी केवळ आश्वासनांवर समाधान मानण्यास नकार देत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. निवेदनातील मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास उपोषण करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे महावितरण प्रशासन या तक्रारीची कितपत गंभीर दखल घेते आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे
.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!