ajinky

banner ads

देशभक्तीच्या रंगात रंगले डी पॉल चे विद्यार्थी

kopargaonsamachar
0

 देशभक्तीच्या रंगात रंगले डी पॉल चे विद्यार्थी  गीत-नृत्याने ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

कोपरगाव समाचार :-डी पॉल पब्लिक स्कूल, कोपरगाव येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अनुराग प्रभाकर येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.




कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीते आणि नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः लहान विद्यार्थ्यांच्या मनमोहक भाषणांना उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात कु. उत्कर्ष वक्ते यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. कु. प्लक्षा दिवे आणि कु. सर्वस्वी गायकवाड यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.



प्रमुख पाहुणे मा. अनुराग प्रभाकर येवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याचे महत्त्व, देशाप्रती नागरिकांची जबाबदारी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले नागरिक घडण्याची गरज यावर प्रेरणादायी विचार मांडले.शाळेचे मुख्याध्यापक रेव्ह. फा. सॅंटो थॉमस यांनी स्वातंत्र्यसंग्रामाचा ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट करत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून दिली. आजच्या पिढीने शिस्त, जबाबदारी आणि संवेदनशीलतेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमाच्या शेवटी कु. त्रिशा वडांगळे हिने आभार प्रदर्शन केले. उपमुख्याध्यापक श्री. पृथ्वीपाल चिरायथ सर यांनी प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि उपस्थितांचे आभार मानले.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!