एआय’च्या युगात कौशल्ये आत्मसात करा, रोजगाराच्या संधींचे नवे दालन खुले!--- श्रीमती लावण्या गंगाराम
संजीवनी विद्यापीठात थेट द्वीतिय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
कोपरगाव समाचार :- जगात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सर्वच क्षेत्रात ६३ टक्के रोजगाराच्या संधी वाढल्या असल्या, तरी आवश्यक कौशल्यांची कमतरता ही मोठी समस्या आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे उद्योगविश्वात कामाच्या पद्धती बदलत आहेत. त्यामुळे नवोदित अभियंत्यांनी एआयसह बदलत्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून उद्योगाच्या गरजांनुसार स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी जेपी मॉर्गन चेसच्या वरिष्ठ प्रॉडक्ट असोसिएट श्रीमती लावण्या गंगाराम यांनी केले.
संजीवनी विद्यापीठात स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नाॅलाॅजी (एसईटी) मध्ये थेट द्वीतिय वर्षात प्रवेश प्रवेष घेतलेल्या नवागतांचे स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रमात लावण्या गंगाराम प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलत होत्या. संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी व्हाईस चांसलर डाॅ. ए.जी. ठाकुर, डीन डाॅ. कविथा राणी पी, डाॅ. आर. प्रिया व्यासपीठावर उपस्थित होते.श्रीमती लावण्या गंगाराम पुढे म्हणाल्या की, उद्योग विश्वात केवळ अनुभवाला महत्त्व नसून, नवीन तंत्रज्ञानानुसार आपण काय नवीन शिकलो आणि त्याचा प्रभावी वापर कसा करतो, यालाच अधिक महत्त्व आहे. सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात केल्यास रोजगाराच्या संधी अधिक सक्षम आणि शाश्वत होतील. तसेच विद्यार्थ्यांनी चांगली स्वप्ने पहावित आणि चांगले मित्र जोडावित. प्रत्येक सत्रात एखादातरी प्रोजेक्ट करून आपले कौशल्ये वाढवावीत. स्वतःचे व्हीजन तयार करून त्यानुसार भविष्याच्या दिशेने मार्गक्रमण करा, असा सल्लाही त्यांनी विध्यार्थ्यांना दिला डॉ.ठाकूर म्हणाले की, डिग्री ही पासपोर्टसारखी असते, तर कौशल्ये व्हिसासारखी असतात. डिग्रीमुळे तुम्हाला मुलाखतीची संधी मिळते. मात्र तुम्हाला अवगत असलेली कौशल्येच तुमची नोकरी टिकवून ठेवतात. यासाठी संजीवनी विद्यापीठात भरपुर उपक्रम राबविले जातात, त्यात सहभागी व्हा.
प्रारंभी डाॅ. कविथा राणी पी यांनी सर्वांचे स्वागत करून एसईटीची ध्येय धोरणे सांगीतली. संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी पाठविलेल्या संदेशातुन नविन विध्यार्थ्यांना शैक्षणिक व चांगले करीअर घडण्याच्या शुभेच्छा दिल्या.
एआयच्या काळात तुमचे शिक्षण पुर्ण होत आहे, ही तुमच्यासाठी अभिमानाची आणि मोठ्या संधींची बाब आहे. तुमचा अभ्यासक्रम एआय आधारित असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची तुम्हाला मोठी संधी मिळत आहे. सोशल मीडियाचा वापर करताना नेहमी जबाबदारीने वागा, कारण आज अनेक नामांकित कंपन्या उमेदवारांची निवड करताना त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलकडेही लक्ष देतात. त्यामुळे चुकीचा वापर तुमच्या करिअरवर परिणाम करू शकतो. संजीवनी विद्यापीठात जपानी, रशियन, जर्मन आणि कोरियन भाषा शिकण्याची संधी मिळत आहे, तिचा पुरेपूर फायदा घेऊन आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला तयार करा. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, येथे शिस्त आणि उपस्थितीला कोणतीही तडजोड नाही. कारण यशस्वी करिअरची सुरुवात चांगल्या शिस्तीतूनच होते.-
अमित कोल्हे, प्रेसिडेंट , संजीवनी युनिव्हर्सिटी





