कोपरगांव बाजार समितीमध्ये सभापती रोहोम यांच्या हस्ते ध्वजारोहन
कोपरगांव समाचार :- कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय स्वातंत्र्य़ दिनानिमित्त़ ध्वजारोहनाचा कार्यक्रम सभापती साहेबराव रोहोम यांचे हस्ते व सन्मा.संचालक प्रकाशराव गोर्डे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.
याप्रसंगी संचालक खंडु फेपाळे, रामचंद्र साळुंके, व्यापारी सुनिल गंगवाल, बाजार समितीचे माजी संचालक भाऊसाहेब शेळके, हमाल पंचायतचे कार्याध्यक्ष वाल्मिकराव कदम, सचिव नानासाहेब रणशुर, सहाय्य़क सचिव मनोज थोरात, सहाय्य़क सचिव बाळासाहेब चांदगुडे, हमाल मापाडी वर्ग, बाजार समिती कर्मचारी तसेच इतर बाजार घटक ध्वजारोहन कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सभापती साहेबराव रोहोम यांनी भारताला स्वातंत्र्य़ मिळालेपासून आजपर्यंत भारतांने केलेल्या विकासाची माहिती देऊन स्वातंत्र्य़ मिळवण्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना नमन केले.
सन्मा.संचालक प्रकाशराव गोर्डे यांनी भारतीय स्वातंत्र्य़ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सचिव नानासाहेब रणशुर यांनी सर्वांना स्वातंत्र्य़ दिनाच्या शुभेच्छा देवून बाजार समितीचे कामकाज चांगले पार पाडावे असे आवाहन केले आहे.






