banner ads

विद्यार्थ्यांच्या ताटात भुंग्याचा वटाणा; पोहेगाव विद्यालयातील धक्कादायक प्रकार!

kopargaonsamachar
0

 विद्यार्थ्यांच्या ताटात भुंग्याचा वटाणा; पोहेगाव विद्यालयातील धक्कादायक प्रकार!

तो आहार बकऱ्यांना द्या.. प्राचार्यांचे अजब उत्तर
कोपरगाव  समाचार -:.. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील श्री ग र औताडे पाटील विद्यालय म्हणजे  परिसरातील विद्यार्थ्यांचे गुरुकुल मात्र याच विद्यालयात  शालेय पोषण आहार विभागाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार घडला आहे. चक्क भुंगा लागलेला वटाणा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी पोषण आहार घरी आणल्यानंतर पालकांच्या ही गोष्ट लक्षात आली.त्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी  व्यक्त केली आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांना पालकांनी या संदर्भात माहिती दिली असता. पोषण आहारामध्ये खरोखर भुंगा लागलेला आहे का याची सत्य परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार अतिशय घाणेरडा असल्याचे त्यांनी सांगितले.




या संदर्भात त्यांनी विद्यालयाचे प्राचार्य विजय भोसले यांच्याशी संपर्क केला असता हा पोषण आहार मुलांना वाटप केला मात्र बकऱ्यांना किंवा जनावरांसाठी याचा उपयोग करा असा अजब उत्तर त्यांनी दिलं.ही बाब योग्य नसल्याचे औताडे यांनी लक्षात आणून दिल्यानंतर मात्र प्राचार्यांनी थेट शासकीय यंत्रणेकडेच बोट दाखवत शिल्लक राहिलेला आहार कटवुन टाकला नाही तर पुढचा आहार मिळत नसल्याचे सांगितले.



विद्यालयात पुढच्या महिन्यासाठी येणाऱ्या आहारासाठी मागच्या महिन्याचा कोठा रीकामा दाखवावा लागतो.यासाठी भुंगे लागणारा आहार विद्यार्थ्यांना वाटून त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा प्रश्न निर्माण होतो.खराब पोषण आहार वाटपामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून यासंदर्भात रयत शिक्षण संस्था, गटशिक्षणाधिकारी कोपरगाव पंचायत समिती व प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून या अजब प्रकाराविषयी तक्रार करणार असल्याचे नितिनराव औताडे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!