रयतच्या श्री रामेश्वर विद्यालय वारी शाळेचे पालकत्व स्विकारून सर्वतोपरी मदत करणार...ॲड.संदीप वर्पे
कोपरगाव समाचार :- रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल पदी सामाजिक कार्यकर्ते ॲड.संदीप वर्पे व रयत सेवक सुरेशराव बोळीज यांची नुकतीच निवड करण्यात आली त्या निमित्ताने नवनिर्वाचित दोनही सदस्यांचा सन्मान सोहळा वारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री रामेश्वर विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके होते
या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शेख यांनी तर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष रोहीत टेके यांनी करून शाळेच्या विकासाकरिता आवश्यक बाबी सर्वांना निदर्शनास आणुन दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास शेळके यांनी केले
सत्काराला उत्तर देतांना ॲड वर्पे यांनी वारीकरांचे आभार व्यक्त करुन रयत शिक्षण संस्था आगामी काळात अधिक वेगाने शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासाठी कटीबद्ध असून ग्रामीण भागातील विद्यालये सोयी सुविधा अभावी मागे राहता कामा नये.कोपरगाव हे शैक्षणिक गुणवत्तेत जिल्ह्यात अग्रेसर असुन ग्रामीण भागातील शाळांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी उत्तर विभागाच्या सल्लागार समितीचे नूतन अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार सकारात्मक आहेतमॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झालेले दुसरे सत्कारमुर्ती सुरेशराव बोळीज यांनी आभार व्यक्त करत याच शाळेत ज्ञानदानाचे कार्य करुन अनेक विद्यार्थी घडविले असुन या शाळेच्या विकासाकरिता तत्परतेने पाठपुरावा करून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले शासन शिक्षक भरती वेळेवर करत नसल्याने संच मान्यातेनुसार रिक्त असणाऱ्या पदावर देखिल शिक्षक उपलब्ध होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली त्यावर संस्थेने शाखा पातळीवर सेवक नियुक्ती करून विद्यार्थ्यांची सोय केलेली आहे शाळांमधील स्वच्छतागृहे आद्ययावत असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
रामेश्वर विद्यालय हे कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील ग्रामीण भागातील विद्यालय असून संस्था पातळीवर या शाखेला आर्थिक दुर्बल गटातून साहाय्य मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे दोनही सत्कार मुर्तींनी आश्वासन दिले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यालयाची मागील काळातील परिस्थिती व त्या बिकट प्रसंगात संस्थेने केलेली कामगिरी अत्यंत कळकळीने सर्वांसमोर मांडली
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, छाबुराव पाळंदे, सुधाकर साळुंके, काकासाहेब गवळी, देवराम शेंडे, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, मच्छिन्द्र गांगड, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य रोहित टेके, मच्छिन्द्र टेके तसेच विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक, शरीफ शेख, जेष्ठ उपक्रमशील शिक्षक कैलास शेळके, वसंत जाधव, सिताराम झुराळे, तुकाराम जेठे, रविंद्र रासकर, लिपिक शिवाजी धट, सुरेश जमदडे यांनी केलेल्या लोकवर्गणीतून विद्यालयातील सुमारे सत्तर गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले. या सत्कार कार्यक्रमासाठी स्थानिक स्कुल कमिटी सदस्य ॲड.शरद जोशी,जि प प्राथमिक शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक चंद्रकांत माळी ,सामाजिक कार्यकर्ते रामदास सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे,शिवचरित्र कार सर्जेराव टेके,माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे ग्रा प सदस्य दौलत वाईकर,दिनेश निकम शिक्षणप्रेमी परसराम पा टेके, माजी विद्यार्थी संघांचे उपाध्यक्ष अरविंद गोर्डे नानासाहेब टेके,स्मिता काबरा, ठोंबरे नानी,गोरे काका, शिक्षिका योगिता कर्डेल, शालिनी कर्पे,अनिसा पठाण, विजय थोरात,वसंत टेके पालक महीला आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते आभार गोरख टेके पाटील यांनी मानले






