banner ads

जीवघेण्या खड्ड्यामुळे पुन्हा दुर्घटनेची भीती

kopargaonsamachar
0

 जीवघेण्या खड्ड्यामुळे पुन्हा दुर्घटनेची भीती

एनएचएआयला नगराध्यक्ष पराग संधान यांचे निवेदन
कोपरगाव समाचार:-कोपरगाव येथील एनएच-७५२जी मनमाड–सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गावरील कोपरगाव शहरालगत येवला नाका ते बॅक कॉलनी दरम्यान शिरोडे शोरूमसमोरील धोकादायक खड्डा तातडीने बुजविण्यासह बँक कॉलनी परिसरात भूमिगत गटाराचे काम त्वरित हाती घेण्याची मागणी कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिकचे प्रकल्प संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.




बँक कॉलनी ते एस एस  जी एम कॉलेज येवला नाका रस्त्यालगत नैसर्गिक पाणी निचरा होणारी नाली तसेच रोड लगत पूर्व बाजूकडील रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले असून पाणी साचलेले असते, वाहन चालकांना त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे सदर भागात नेहमी मोठे अपघात होत असतात.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जुना नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील शिरोडे शोरूम व येवला नाका परिसरात मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी यापूर्वी एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला असून त्यानंतरही अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. या मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थी, साईभक्त तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने संबंधित खड्डा तातडीने बुजविणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.




तसेच साईकुबेर ते एस.एस.जी.एम. महाविद्यालय रस्त्यालगत पूर्वी अस्तित्वात असलेले पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे गटार बंद झाल्याने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडला आहे. परिणामी शारदानगर, बॅक कॉलनी तसेच परिसरातील इतर भागांमध्ये पावसाचे पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असून रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
 भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी या ठिकाणी भूमिगत गटाराचे काम तातडीने हाती घेण्याची मागणीही नगराध्यक्ष पराग संधान यांनी केली आहे.या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नगराध्यक्ष पराग संधान यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.


एनएच-७५२जी नगर–मनमाड–सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गावरील कोपरगाव शहरालगत येवला नाका ते बॅक कॉलनी दरम्यान शिरोडे शोरूमसमोरील मोठा खड्डा वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.सध्या पावसाळा सुरू असल्याने हा खड्डा पावसाच्या पाण्यात झाकला जातो आणि त्याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही.यापूर्वी याच ठिकाणी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने हा खड्डा तातडीने बुजवून आवश्यक ती उपाययोजना करावी. तसेच बॅक कॉलनी परिसरातील भूमिगत गटाराचे कामही तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे
.
पराग संधान, नगराध्यक्ष, कोपरगाव नगरपरिषद

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!