banner ads

रशियात चमकणार संजीवनीचे तारे!

kopargaonsamachar
0

 रशियात चमकणार संजीवनीचे तारे!

कोपरगाव समाचार :--ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचे माजी मंत्री व संजीवनीचे संस्थापक स्व.  शंकरराव कोल्हे यांचे  दूरदर्शी स्वप्न साकार करण्याच्या दिशेने संजीवनी युनिव्हर्सिटीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. संजीवनी युनिव्हर्सिटी मधील एकूण १६ विद्यार्थ्यांची  रशियातील प्रतिष्ठित युरल फेडरल युनिव्हर्सिटीच्या  इंटरनॅशनल रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड झाली. हे सर्व विद्यार्थी नुकतेच १५ दिवसांच्या इंटर्नशिपसाठी रशियाला रवाना झाले आहेत.   संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नामुळे २५० पेक्षा अधिक विध्यार्थ्यांना  आत्तापर्यंत अशी  संधी प्राप्त झाली आहे.




       रशियाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये  यश संकोशकुमार रणेजा, ओम सुनील कपिले, साईश दिनेश शिंदे, सैफुल्लाह पठाण शफिकखान , स्वप्नील संदीप गिते, अदिती प्रदीप औताडे, आरोही शांताराम घुमरे, आदित्य सचिन बोठे, साईराज अशोक चव्हाण, सिद्धी राजेश तिरसे, साक्षी सुजित कदम, साईश सतीश पोकळे, सिद्धांत राजेंद्र गोंदकर, आयुश  मुकेशकुमार रॉय, जय चंद्रशेखर काजळे व तिथी विनोद मालकर यांचीही निवड झाली आहे. डॉ. सुप्रिया भगवत आणि प्रा. वेंकट रेड्डी हे या विद्यार्थ्यांसोबत रशियाला गेले असून, विद्यार्थी तेथील प्राध्यापक व संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली विविध संशोधन प्रकल्पांवर काम करणार आहेत.




  स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर केवळ डिग्री असून चालत नाही, त्यामुळे आमचा सर्व भर विध्यार्थ्यांना  कौशल्याधारित शिक्षण, इंडस्ट्री एक्सपर्ट यांचे मार्गदर्शन व इंटर्नशिप यावर असतो.  संजीवनीच्या अनेक विध्यार्थ्यांना  आजवर विविध देशांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळाली आहे.  आता १६ विद्यार्थी रशियात जाऊन युरल फेडरल युनिव्हर्सिटीतील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्च प्रकल्पांवर काम करणार आहेत. या अनुभवातून त्यांना जागतिक दर्जाचे संशोधन, नवे तंत्रज्ञान समजेल. संजीवनीचे विद्यार्थी आज जागतिक स्पर्धेत आत्मविश्वासाने उभे राहत असून, या ग्लोबल एक्सपोजरमुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील. यापूर्वी संजीवनीच्या विध्यार्थ्यांना  तैवान, कॅनडा, फिलिपाईन्स, ट्युनिशिया, युनायटेड किंगडम, इत्यादी देशांमधील  नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळाली.  भविष्यातही  विध्यार्थ्यांच्या  गुणवत्ता वाढीसाठी संजीवनी कायम प्रयत्नशील राहिल.- अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी



     रशियाला रवाना होण्यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तर संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा  व त्यांच्या पालकांचा  सत्कार करण्यात आला. या सत्काराला व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकूर, डीन डॉ. कविथा राणी, डॉ. आर. प्रिया, डॉ. सरिता पवार, डीन ऑफ अॅकेडेमिक्स डॉ. अनिल पवार, डीन ऑफ इंटरनॅशनल रिलेशन डॉ. महेंद्र गवळी, डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, डॉ. देवयानी जाधव, डॉ. किशोर जाधव आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!